Headlines

मळगाव रस्तावाडी येथील भाऊ पवार यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.०७-: मळगाव-रस्तावाडी येथील रहिवासी सीताराम उर्फ भाऊ राघोबा पवार (५४) यांचे शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले. भाऊ या टोपण नावानेच ते मळगावात परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, दोन भाऊ, तीन विवाहित बहिणी, भावजय, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मळगाव येथील सलून व्यावसायिक महेश पवार यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

You cannot copy content of this page