आदेश असूनही ग्रामपंचायतीत कामावर हजर करून घेत नसल्याची तक्रार..
⚡सावंतवाडी ता.०८-: वरिष्ठांच्या आदेशानंतरही ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कामावर हजर करून घेत नसल्याच्या निषेधार्थ वैभवी प्रशांत साटेलकर यांनी आज जागतिक महिला दिनाच्या दिवशीच सावंतवाडीत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे एकीकडे जिल्हाभर महिला दिन साजरा केला जात असताना प्रशासन गर्भवती महिलेला न्याय देणार का, ..?असा सवाल उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी साटेलकर यांना ग्रामपंचायत स्तरावर डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कामावर हजर करून घेण्याबाबत वरिष्ठांकडून आदेश देण्यात आले होते. मात्र संबंधित स्तरावर अद्याप त्यांना कामावर रुजू करून घेतले गेले नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला.विशेष म्हणजे आजच जागतिक महिला दिन साजरा केला जात असताना एका गर्भवती महिलेला न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसावे लागत असल्याने या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे. प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, तसेच संबंधित महिलेला न्याय मिळतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
