⚡मालवण ता.०५-:
मालवण मधील ब्युटी पार्लर व्यवसायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सलील मांजरेकर यांची स्वतंत्र कोकणराज्य अभियाना तर्फे कोकण रत्न पदवीसाठी निवड करण्यात आली आहे.
सौ. सायली मांजरेकर या गेली अनेक वर्षे मालवणात ब्युटीशियन म्हणून कार्यरत असून सायली ब्युटीपार्लरच्या माध्यमातून त्या शासनमान्य ब्युटीशियन कोर्स देखील घेत असून आजपर्यंत त्यांनी अनेक युवती व महिलांना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले आहे. तसेच सामाजिक कार्यातही त्या सक्रिय असतात. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन त्यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियाना तर्फे कोकण रत्न पदवीसाठी निवड झाली आहे. कोकण रत्न पदवी प्रदान सोहळा शनिवार दि. १३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पत्रकार, संपादक सचिन कळझुनकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सौ. सायली मांजरेकर यांना कोकण रत्न पदवी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती
स्वतंत्र कोकणराज्य अभियान मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे, सल्लागार दिलीप लाड यांनी दिली आहे. सौ. सायली मांजरेकर यांना कोकण रत्न पदवीसाठी निवड झाल्याने त्यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
