सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे महिला दिन उत्साहात साजरा…

उत्कृष्ट काम केलेल्या बँक सखींचा करण्यात आला खास सत्कार..

⚡ओरोस ता.०८-: सिंधुदुर्ग महिला दिनाचे अवचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. हर्षदा प्रसाद देवधर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून महिला दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महिला दिन कार्यक्रम सोहळ्यास बँकेच्या संचालिका सौ. प्रज्ञा ढवन, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे,सरव्यवस्थापक दिवाकर सावंत,केबी वरक शरद सावंत,बँक महिला कर्मचारी,अधिकारी व बँक सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले त्यांनी बँक कामकाजाबाबत महिलांचा असलेला सहभाग त्यांचे बँक कामाजातील उल्लेखनीय कार्य यावेळी विशद केले प्रमोद गावडे यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट काम केलेल्या बँक सखींचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन खास सत्कार करण्यात आला सौ.प्रीती चव्हाण शाखा-फोंडाघाट, सौ. तन्वी तुळसुलकर शाखा-तुळसुली,सौ. शिवानी वेंगुर्लेकर शाखा- कामळेवीर,सौ वैशाली बोवलेकर शाखा-मठ, सौ. दुर्वा गवळी शाखा- सावंतवाडी ,सौ समीक्षा वालावलकर शाखा-नेरुर या सहा बँक सखींचा उत्कृष्ट बँक कामकाज केल्याबद्दल भेटवस्तू देउन खास सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित डॉक्टर हर्षदा प्रसाद देवधर यांनी उपस्थितांना महिला दिनाविषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बँकेचे सर व्यवस्थापक(प्रशासन) शरद सावंत यांनी केले.

You cannot copy content of this page