कणकवलीत भारत – न्यूझीलंड सामन्याचा मोठ्या स्क्रीनवर जल्लोष…

बजरंग दल व हिंदू रक्षक सेना यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाईव्ह प्रक्षेपण:क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी…

⚡कणकवली ता.०८-: बजरंग दल आणि हिंदू रक्षक सेना कणकवली यांच्या वतीने रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या स्क्रीनवर करण्यात आले. या उपक्रमाला कणकवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पुलाखाली मोठी एलईडी स्क्रीन लावून सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सामन्याचा प्रत्येक क्षण क्रिकेटप्रेमींनी एकत्र येत मोठ्या उत्साहात अनुभवला. सिक्स किंवा चौकार लागला की डीजेच्या तालावर उपस्थितांनी जल्लोष करत वातावरण रंगवले.
या कार्यक्रमासाठी आयोजकांकडून स्क्रीनसमोर बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. अनेक क्रिकेटप्रेमींनी हातात तिरंगा घेत भारताच्या संघाला पाठिंबा दर्शवत सामन्याचा आनंद लुटला. सामन्याच्या निमित्ताने रात्री उशिरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी पाहावयास मिळाली.

फोटो – मोठ्या स्क्रीनवर सुरू असलेल्या क्रिकेट सामन्याचा आनंद लुटताना क्रिकेट प्रेमी (छाया अनिकेत उचले )

You cannot copy content of this page