टी ई टी सक्ती विरोधात हजारो शिक्षक आंदोलनात…

शाळा बंद ठेवून सहभाग:निर्णय बदलला नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा..

ओरोस ता ५
शिक्षकांच्या टी. ई. टी. सक्ती व इतर प्रलंबित प्रश्नाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ५ डिसेंबरला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने शाळा बंद ठेऊन जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले .यावेळी शासन धोरणाविरोधात जोरजोरत घोषणा देऊन परिसर दणानुन सोडला. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते.
शिक्षकांच्या टी.ई.टी. सक्ती व इतर प्रलंबित प्रश्नांबाबत आज संपूर्ण राज्यभर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेत शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संखेने जिल्हभरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकवटले . आजच्या या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक भारती सिंधुदुर्ग ( माध्यमिक), सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना सिंधुदुर्ग, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक संघ, मराठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ ,उच्च श्रेणी मुख्याध्यापक संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना ,महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती या संघटना आजच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या .

You cannot copy content of this page