⚡मालवण ता.०५-:
अति दारु पिणाऱ्या व्यक्तींना दारु पिण्याच्या सवयीपासुन परावृत्त करून समाजात चांगले जीवन जगण्याचा मार्ग दाखविणाऱ्या व गेली २५ वर्षे मालवण मध्ये विनामुल्य कार्य करणाऱ्या अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस (अनामिक मद्यपी संघटना) मालवण या संस्थेचा २५ वा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त शासकिय ग्रामिण रुग्णालय मालवण येथे ३ दिवसीय मोफत आरोग्य शिबिर (डिटॉक्स कॅम्प) दि. ७, ८ व ९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आयोजित केले आहे.
या शिबिरामध्ये ज्यांना ‘दारु पिणे’ सोडावयाची इच्छा आहे, रोजच दारु प्यावी लागते. हातापायाची थरथर होणे, विचित्र भास होणे, तसेच दारु अति पिण्यामुळे शरीरावर झालेले वाईट परिणाम या सारख्या शारिरीक व मानसिक आजारावर इलाज यावर ए. ए. बांधवांचे मार्गदर्शन होणार आहे. या शिबिरात ३ दिवस पेशंटला औषधोपचार व जेवणाची मोफत सेवा दिली जाईल. तरी गरजु व्यक्तींनी याचा अवश्य लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी ग्रामीण रुग्णालय मालवण, फोन-(02365) 252032 ए. ए. सभासद, मोबा – 9860436765, 7588906692 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
