⚡दोडामार्ग ता.०७-: सासोली गावात घराजवळील कचऱ्याला लावलेली आग वाऱ्यामुळे शेती-बागायतीकडे पसरू लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती भाजप युवा मोर्चा दोडामार्ग तालुका सरचिटणीस अंकुश (भैया) नाईक यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना कळविल्यानंतर नगरपंचायत प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक युवकांच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले. मदतकार्यात सर्वेश परब, कल्पेश गांजिल, निखिल ठाकूर, सोमेश गांजिल, दीप्तेश गावस, मनोज गावस, सर्वेश देसाई आणि विशाल चव्हाण यांनी सहभाग घेतला.
वेळीच कारवाई झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून ग्रामस्थांनी संबंधितांचे आभार मानले आहेत.
सासोलीत कचऱ्याच्या आगीवर वेळीच नियंत्रण; मोठा अनर्थ टळला…
