निवडणूकांत आरोप- प्रत्यारोप होण स्वाभाविक, मात्र, महायुतीमध्ये आम्ही एकत्रित सत्तेत आहोत…

रवींद्र चव्हाण:राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच सरकार गतीमान पद्धतीने काम करतय..

⚡सावंतवाडी ता.०५-: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत आरोप- प्रत्यारोप होण स्वाभाविक आहे. मात्र, महायुतीमध्ये आम्ही एकत्रित सत्तेत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेसाठी २०२९ पर्यंत राज्य व केंद्र सरकार सुरळीतपणे चालावं अशी धारणा आमची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीतील नेत्यांशी चर्चा झाली. घडलेल्या काही गोष्टींवर पडदा टाकण्याचा निर्णय झाला आहे अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच सरकार केंद्रात व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच सरकार गतीमान पद्धतीने काम करत आहे. वर्षभरात सरकारनं केलेल्या कामाचा आढावा देत महायुतीच सरकार महाराष्ट्राला अधिक गतीमान करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, देशात व राज्यात एकविचाराच सरकार असल्याने कामाला गती मिळत आहे. एक वर्ष राज्यातील सरकारला पूर्ण झालं आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार राहील. ३२ हजार कोटींची नुकसानभरपाई दिली गेली. सौर ऊर्जेसाठीही वेगळ्या पद्धतीने काम केलं. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याच काम केलं.जलसंवर्धनाच कामासह विविध प्रकल्प केले गेले. प्रलंबित प्रकल्प सुरू केले. ३७ हजार जलयुक्त शिवाराची काम मार्गी लागली. पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. शक्तीपीठ महामार्गासाठीही सरकारच्या माध्यमातून प्रयत्न आहे. वाढवण बंदर निर्मितीसह आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न आहे‌. महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात नंबर वन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे‌. महिला सक्षमीकरणासाठी उमेदला ताकद देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. १ लाख ९ हजार ४४० कुटुंबांना नळजोडणी, आजारांचा योजनेत समावेश केला गेलाय. महायुतीच सरकार गतीमान व पारदर्शक पद्धतीने कारभार करत आहे. २०२९ पर्यंत महाराष्ट्राला अधिक गतीमान करणं आवश्यक आहे‌ असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका काही पुर्ण झाल्यात, काही होणार आहेत. यात आरोप- प्रत्यारोप होण स्वाभाविक आहे. मात्र, महायुतीमध्ये आम्ही एकत्रित सत्तेत आहोत. शिवसेना, राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी २०२९ पर्यंत राज्य व केंद्र सरकार सुरळीतपणे चालावं अशी धारणा आमची आहे. काही घटनाक्रमांमुळे विषय पुढे होत राहीले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीतील नेत्यांशी चर्चा झाली. हे विषय अधिक वाढवू नये असं त्यांचं म्हणणं आहे. घडलेल्या काही गोष्टींवर पडदा टाकण्याचा निर्णय झाला आहे. कल्याण डोंबिवली व हा काही भाग संवेदनशील आहे. काही प्रवेश शिवसेनेकडून घेतले तसेच भाजपकडून घेतले. यावर चर्चा येणाऱ्या काळात होणार आहे. काही प्रवेशावर आक्षेप आहेत‌. मात्र, यावर वरिष्ठ मंडळी बसून चर्चा करणार आहे. यावर पडदा पडून आपापसातील लोकांचे प्रवेश घेऊ नये असा निर्णय घेतला आहे‌. महाराष्ट्राला गतीमान करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे अशी माहिती त्यांनी दिली. तर जिल्ह्यातील आरोग्य असुविधांबाबत विचारलं असता त्यांनी उत्तर देणं टाळलं. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, युवानेते विशाल परब, मनिष दळवी, रणजीत देसाई, बबन साळगावकर, ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक आदींसह भाजपचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page