Global Maharashtra Breaking News

राणेंनी एकनाथ शिंदेंना शंभर वेळा भेटण्यामागचे कारण जाहीर करावे…

परशुराम उपरकर:राणे हे भाजपाचे खासदार आहेत की शिंदे शिवसेनेचे संपर्कप्रमुख…? कणकवली : भाजपा खासदार नारायण राणे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत कोणालाही प्रवेश देण्यासाठी आपली परवानगी आवश्यक असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर माजी आमदार परशूराम उपरकर यांनी राणेंवर जोरदार टीका करत त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राणे हे भाजपाचे खासदार आहेत की शिंदे शिवसेनेचे संपर्कप्रमुख?…

Read More

शिल्पग्राम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार..

मुख्याधिकारी सौ अश्विनी पाटील: ठाकरे सेनेचे आशिष सुभेदार यांच्या मागणीला यश.. ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा तिठ्यावर ते शिल्पग्राम परिसरात कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाणी सावंतवाडी नगरपालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे दुजोरा मुख्याधिकारी सौ अश्विनी पाटील यांनी दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा पदाधिकारी आशिष सुभेदार यांनी खासकिलवाडा तिठा ते शिल्पग्राम परिसर येथे वारंवार…

Read More

सावंतवाडीत आवाज साधना शास्त्र कार्यशाळा संपन्न…

कुडाळ : सावंतवाडी येथील ‘रघुकुल स्वरविहारच्या’ बाराव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी रोटरी क्लब हॉल, सावंतवाडी येथे ‘आवाज साधना शास्त्र (Voice Culture) कार्यशाळा’ संपन्न झाली. पं. डॉ. समीर दुबळे, पुणे यांनी आवाज साधना शास्त्राबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.डॉ. समीर दुबळे हे नामवंत गायक तसेच आवाज साधना शास्त्राचे अध्यापक असून पं. राम माटे, पं. अशोक…

Read More

कातवड महापुरुष पार येथे २ रोजी कार्यक्रम…

⚡मालवण ता.२९-:मालवण तालुक्यातील कातवड येथील श्री देव महापुरुष पार, कुदळभाम येथे शुक्रवार दि. २ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दुपारी ३.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून सायंकाळी ७.३० वाजल्यापासून महाप्रसाद, रात्री ८ वाजता स्थानिक भजन, ९ वाजता श्री देव सातपाटेकर दशावतार नाट्यमंडळ निरवडे, सावंतवाडी यांचा…

Read More

मुक्ताई ॲकेडमीच्या “आवाज व अभिनय” कार्यशाळेला सुरुवात…

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने व्हिजन, मुंबई यांच्या सहकार्याने शालेय विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या “आवाज व अभिनय” कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली, मालवण येथील पहीली ते दहावीतील तब्बल अठ्ठेचाळीस मुला-मुलींनी कार्यशाळेत सहभाग घेतला.चार दिवस चालणा-या या कार्यशाळेचे आयोजन सावंतवाडी येथील श्री.पंचम खेमराज महाविदयालयाच्या सभागृहात करण्यात आले. उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे…

Read More

गिअर अप जिम अँड वेलनेस सेंटरचे कुडाळात उदघाटन…

भविष्यात विविध स्पर्धांसाठी सहकार्य करणार:उदघाटक ऍड. संग्राम देसाई यांची ग्वाही.. कुडाळ : सर्व सोयी सुविधांनी युक्त अद्ययावत जिम कुडाळ नगरीत साकारली आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.या भागाचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भविष्यात मोठ मोठ्या बॉडीबिल्डिंग, वेटलिफ्टिंग स्पर्धा घेण्यासाठी निश्चितच सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य अँड…

Read More

अद्वैत फाउंडेशनच्या वतीने गोपुरी आश्रमात व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन…

कणकवली : अद्वैत फाऊंडेशनच्या कणकवली च्या वतीने राष्ट्रसेवा दल व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिर गोपुरी आश्रम वागदे येथे ९ मे ते १३ मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. साने गुरुजींच्या समतेच्या आणि मानवतेच्या शिकवणीचे संस्कार या शिबिरात केले जातात. कवायत, लेझिम, झांज, पथनाट्य, एरोबिक्स , कॅलेथानिक्स, ग्रेट भेट आदी उपक्रमासह धम्माल गप्पागोष्टींच्या माध्यमातून हसत खेळत शिबिरार्थींच्या…

Read More

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल कणकवली तालुक्यात अव्वल…

कणकवली : विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच कला, क्रीडा क्षेत्रात मुलांना घडवणारे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज, वरवडे. विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, तज्ज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, भव्य मैदान, अशा सर्वच पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवलेल्या आयडियल इंग्लिश स्कूल ने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक पटकवत तालुक्यात चमक…

Read More

अपर पोलीस अधीक्षकांसह आठ अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मान…

१ मे रोजी पालकमंत्री राणेंच्या हस्ते होणार वितरण.. ओरोस ता २९सिंधुदुर्गचे अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश प्रदीप रावले यांच्यासह जिल्ह्यातील आठ अधिकाऱ्यांना पोलीस दलातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनाच्या १ मे रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते त्यांचा गौरव होणार आहे.राजाच्या पोलीस महासंचालक श्रीमती…

Read More

सावंतवाडी आगारात नवीन गाड्यांच्या उद्घाटनात गोंधळ…

अनुप नाईक: पहिल्याच फेरीत बिघाडामुळे प्रवाशांना फटका.. सावंतवाडी, दि. २९: सावंतवाडी आगारात सोमवार, दिनांक २८ रोजी दाखल झालेल्या नवीन गाड्यांचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून घाईगडबडीत उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र, या घाईगर्दीत गाड्यांची योग्य तपासणी न करताच पाच गाड्यांचे उद्घाटन करून त्यांना विविध मार्गांवर रवाना करण्यात आले. याचा फटका पहिल्याच दिवशी प्रवाशांना बसला.सावंतवाडी-रत्नागिरी मार्गावर…

Read More
You cannot copy content of this page