१३ ते १७ डिसेंबर : धार्मिक विधी, देवतरंग आणि पारंपरिक स्थळी भेटीगाठी
⚡देवगड ता.०६-: शतकानुशतके जोपासली गेलेली आध्यात्मिक परंपरा उजळून मिठबाव श्री देव रामेश्वर पाच दिवसीय डाळपस्वारी 2025 चे औपचारिक वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. १३ ते १७ डिसेंबरदरम्यान भक्तीमय वारी, वयक्तिक न्याय (मेळे), देवतरंग आणि सेवक भेटींच्या धार्मिक वातावरणात पंचक्रोशीतून हजारो भाविक सहभागी होणार आहेत. उत्सव समितीने संपूर्ण कार्यक्रमपत्रिका जाहीर केली असून यंदाची वारी अधिक भव्यतेने पार पडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
१३ डिसेंबर २०२५ – डाळपस्वारीचा पहिला दिवस
पहाटे ६.३० वाजता श्री देव रामेश्वर मंदिरात गावघर १२/५ देव सेवकांच्या उपस्थितीत प्रारंभ होईल. सकाळी ८ वाजता श्री देव रामेश्वर मंदिरातून प्रस्थान होऊन कुलस्वामी मंदिर जोगलवाडी, देऊळवाडी भवांडा, पडळी, गोलतकर ब्राह्मणस्थळ अशा पारंपरिक स्थळी भेटी घेतल्या जातील.दुपारी १ वाजता उत्कटवाडी गणेश मंदिरात भोजनानंतर सायंकाळी फाटक मंदिर भेट, चौगुले सेवक भेट, खाडिलकर महाजन भेट असे कार्यक्रम होतील.रात्री ९ वाजता सुभेदार सेवक भेट व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.रात्री ११ वाजता झाडाखाली स्थिर होऊन विश्रांती व मुक्काम असेल.
१४ डिसेंबर २०२५ – डाळपस्वारीचा दुसरा दिवस या दिवशीही वैयक्तिक न्याय (मेळे) होतील. सकाळी ८ वाजता प्रस्थानानंतर विठ्ठल-रखुमाई मंदिर, डाळप खळ्यावर भेट (भंगसाळ), म्हसेश्वर (खुरणी) .तांबळडेग विठ्ठल रुखुमाई मंदिर भेट,तांबळडेग संपूर्ण गाव रयतेतर्फे विठ्ठल रखुमाई मंदिरात भोजन व्यवस्था असेल.यानंतर दक्षिणवाडा, उत्तरवाडा, वेताळ खुरणी, डगरेवाडी कुलस्वामी मंदिरात भेट रात्री डगरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने कुलस्वामिनी मंदिरात भोजन होऊन देवतरंग गजबादेवी मंदिरात स्थिर होऊन मुक्काम असेल.
१५ डिसेंबर रोजी एकादशी असल्याने या दिवशी सर्व तरंग–साज गजबादेवी मंदिरातच थांबणार आहेत. गावघरातील वयक्तिक न्याय सकाळी १० वाजता सुरू होतील.
१६ डिसेंबर २०२५ – डाळपस्वारीचा चौथा दिवस यादिवशी मेळे वैयक्तिक न्याय मेळे होणार नसून सकाळी ६.३० वाजता गजबादेवी मंदिरातून प्रस्थान होईल.कातवण स्मशानातील खुरणी, खोत सेवक भेट, कातवणकर सेवक भेट, महापुरुष कातवण भेटी झाल्यानंतर गावहोळी येथे भेट ,केळया येथे खुरणी झाल्यावर श्री निलराज लोके यांच्या वतीने भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.दुपारी गोगटेतळे भेट, मिठबाव वेस भेट विधी, सोमण (उपाध्या) व काळे महाजन भेट, बाराचा पूर्वस सुतारवाडी भेट आणि पुढे देवी काळंबादेवी भेट होईल.रात्री देवी सातेरी येथे मुक्काम असून घाडी बंधूंच्या वतीने जेवणाची सोय केली आहे.
१७ डिसेंबर २०२५ – डाळपस्वारीचा अंतिम दिवस यादिवशी वैयक्तिक न्याय वेळेच्या नियोजनानुसार घेतले जातील. सकाळी ७ वाजता देवी सातेरीकडून प्रस्थान होऊन म्हारकी (खुरणी), मयेकर मूळघर, नाडकर्णी जमेदार, बिर्जे मूळघर, वाडेकर, शेटये मूळघर भेटी होणार आहेत.नंतर नाचणकर सेवक भेट व नाचणकर परिवाराच्या वतीने दुपारी भोजन व्यवस्था आहे.यानंतर पोतदार, मिठबावकर, राणेवाडी येथील बाराची तुळस भेट घेतली जाईल.रात्री लोके कुलस्वामिनी मंदिरात भेट व लोके बंधूंकडून भोजन व्यवस्था असेल.यानंतर गुरव सेवक भेट, पुजारे मूळ घर भेट, 12/5 मांडावर (घाडी घर) येथे भेट होईल.मध्यरात्री श्री देव रामेश्वर मंदिरात पारंपरिक समारोप होऊन डाळपस्वारीची सांगता होईल.
भक्तीमय वातावरणात पाच दिवसीय वारी
डाळपस्वारीची रमणीय वारी, पारंपारिक घर-घर भेटी, साज-तरंग, खुरणी विधी आणि धार्मिक सोहळे यावर्षीही भाविकांना आध्यात्मिक समाधान देणार आहेत. पाच दिवसांच्या कार्यक्रमात तिन्ही गावची रयत सहभागी होणार असून सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सोहळा अधिक भव्य करावा, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान समितीचे वतीने करण्यात आले आहे.
