नगरसेवकांनाच माहिती मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था…?

माजी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांचा सवाल..

⚡वैभववाडी ता.१२-: वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी कार्यालयात नाहीत असे सांगून नगरपंचायत प्रशासन आम्हाला कोणती माहिती देत नाही व विचारणा ही करत नाहीत जर नगरसेवकांना ही वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनाची काय परिस्थिती असेल असा सवाल माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अक्षता जैतापकर यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे.
निवेदनात पुढे असे म्हटले की
गेले तीन ते चार महिने नगरपंचायतीमध्ये प्रशासकीय कामानिमित्त ऑफिसमध्ये गेले असता वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी प्रतीक थोरात ऑफिसमध्ये नसल्याचे सांगितले जाते त्यामुळे कोणतीही माहिती मिळू शकत नाही व केव्हा येणार आहेत कोणत्या दिवशी ऑफिसमध्ये असणार आहेत हेही सांगितले जात नाही व फोन द्वारे संपर्क केला असता ही उचलत नाही व परत त्याचा रिप्लाय दिला जात नाही असे का? जर आम्हा नगरसेवकांना ही वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती असेल असा सवाल माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अक्षता जैतपकर यांनी निवेदनातून केला आहे.

You cannot copy content of this page