⚡मालवण ता.०६-: मराठी साहित्य संमेलनात कविकट्टा या काव्यमंचासाठी मालवणचे प्रसिद्ध कवी रुजारिओ पिंटो यांना ‘कोकणं रडत’ ही कविता सादर करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. कविकट्टा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी होणार आहे. पिंटो यांच्या कवितेला मिळालेल्या संधीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
९९ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा, शाहूपुरी सातारा आणि मावळा फाऊंडेशन, सातारा यांना मिळालेला आहे. हे संमेलन १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत सातारा येथे होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कविकट्टा या काव्यमंचासाठी कविता निवड समितीतर्फे पिंटो यांनी पाठविलेल्या ‘कोकणं रडत’ या कवितेची निवड करण्यात आली असून सदर कविता सादर करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कविता ३ रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत सादर करण्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहवे, असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कविकट्टा या मंचावर सहभागी कविता सादर केल्यानंतर पिंटो यांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे
