शिक्षण क्षेत्रातील प्रगतीत सुरेश भाईंचे योगदान उल्लेखनीय…

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले: वाढदिवसानिमित्त भेट देत दिल्या शुभेच्छा..

⚡दोडामार्ग ता.०६-:
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ नेते तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त दळवी बिल्डिंग सभागृह येथे विविध पक्षांचे कार्यकर्ते, व्यापारी, डॉक्टर्स, वकील, पत्रकार आदी मान्यवरांनी उपस्थित राहून सुरेश भाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

दोडामार्ग तालुक्याच्या सर्वांगीण विकासात व शिक्षण क्षेत्रातील प्रगतीत सुरेश भाईंचे योगदान उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी यावेळी काढले. दोडामार्ग येथे स्वतः उपस्थित राहून त्यांनी सुरेश भाईंना मनःपूर्वक शुभेच्छा देत, त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशी देव पाटेकर चरणी प्रार्थना केली.

या कार्यक्रमास माजी कस्टम अधिकारी श्री. पाटील, मनोज वाघमोरे, गोपाळ सावंत तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाचा कार्यक्रम ऊत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला.

You cannot copy content of this page