Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी आरोंदा वस्तीची बस पूर्ववत;ग्रामस्थात समाधान…

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी वरून आरोस मार्गे सुटणारी सायंकाळची आरोंदा वस्तीची एसटी बस मागील काहींदिवस आरोंदा येथे वस्तीला जात नसल्याने येथील विद्यार्थ्यांची ,ग्रामस्थांची बरीच गैरसोय होत होती.त्यामुळे आरोंदा ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी याबाबत सावंतवाडी एसटी डेपो येथील अधिकाऱ्यांशी चर्चा , पाठपुरावा करून संबंधित वस्तीची एसटी बस पूर्ववत करण्याची मागणी केली.त्यांच्या या मागणीला संबंधित अधिकाऱ्यांनी होकार दर्शवित सदरील एसटी…

Read Full News

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत पोलीस संचालन…

कणकवलीमतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस ठाण्याकडून पोलीस संचलन करण्यात आले. पोलीस स्टेशन येथून बाजारपेठेतून ढालकाठी पर्यंत व तेथून डीपी रोडने मुख्य चौकातून पोलीस स्टेशन असे हे संचलन करण्यात आले. यावेळी या संचलनाचे प्रतिनिधित्व पोलीस इन्स्पेक्टर तेजस नलावडे, यांच्या नेतृत्वाखाली. एपीआय नागेश चिकणे, पीएसआय महेश शेडगे, पीएसआय दशरथ चव्हाण, पीएसआय सोनवणे यांच्या सह साठ अंमलदार, यात सहभागी…

Read Full News

आंबोली घाटात शेतकऱ्याला बेदम मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल…

​ ⚡​सावंतवाडी ता.१९-:आंबोली घाटातील नानापाणी परिसरात बैल घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याला आणि त्याच्या साथीदारांना तिघांनी लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ​

Read Full News

मालवणा मतमोजणीला, कडेकोट बंदोबस्त व वाहतूकीत बदल…

⚡मालवण,ता.१९-:मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया २१ डिसेंबर रोजी होत आहे. यासाठी निवडणूक व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. येथील पालिकेत सकाळी दहा वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेस सुरवात होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक थोरात, पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली. मालवण नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी प्रक्रियेची तयारी पूर्ण…

Read Full News

मालवण येथे उद्या श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा…

⚡मालवण, ता.१९-: श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ मालवण यांच्यावतीने श्री संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी सोहळा २० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कोळंब भटवाडी हडकर दुकान नजीक येथील अशोक (बबन) नेमळेकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.यानिमित्ताने संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश…

Read Full News

सावंतवाडीत भक्तीरसाचा महोत्सव; इस्कॉनतर्फे भव्य भजनसंध्येचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१९-:आंतरराष्ट्रीय कृष्णभावनांमृत संघ (इस्कॉन), सावंतवाडी शाखेच्या वतीने रविवार, २१ डिसेंबर रोजी शहरात भव्य ‘भजनसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत हा सोहळा रंगणार असून, यानिमित्ताने अध्यात्मिक विचारांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे. ​कार्यक्रमाचे स्वरूप आणि प्रमुख उपस्थिती ​या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे इस्कॉनचे जगदविख्यात गुरु…

Read Full News

रियाज खान यांची शिंदे युवासेना सावंतवाडी तालुका प्रमुखपदी निवड…

⚡सावंतवाडी ता.१९-: शिंदे युवासेना सावंतवाडी तालुकाप्रमुख पदावर श्री. रियाज खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी जाहीर केली आहे.हे नियुक्तीपत्र आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब, यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे…

Read Full News

देवगडमध्ये २० डिसेंबरला महास्वच्छता अभियान; सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन…

⚡देवगड ता.१९-:जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचायत समिती देवगड यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यात दिनांक २० डिसेंबर रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत देवगड तालुक्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात येणार आहे. देवगड तालुका पर्यटन तालुका म्हणून ओळखला जात असल्याने स्वच्छता व…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिष्टाईनंतर देवगड जामसंडे जलवाहीनी दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू…

⚡देवगड ता.१९-:देवगड जामसंडे नळ योजनेच्या मागील कामाचे ८९ लाख रूपये येणे असल्याने ठेकेदार अडून बसला होता. दुर्दैवाची बाब म्हणजे पाण्याचा गंभीर प्रश्न असूनही नगरसेवक व प्रशासन मुग गप्प गिळून होते. अखेर पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना दिल्या नंतर शुक्रवारी सकाळपासून दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू झाले असूनशहरातील जनतेला शनिवारपासून पाणीपुरवठा होणार आहे. ठेकेदाराचे मागील ८९ लाख…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २० डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.१९-:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते ,जनता यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

Read Full News

You cannot copy content of this page