⚡सावंतवाडी ता.१९-:
आंबोली घाटातील नानापाणी परिसरात बैल घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याला आणि त्याच्या साथीदारांना तिघांनी लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
