मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत पोलीस संचालन…

कणकवली
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस ठाण्याकडून पोलीस संचलन करण्यात आले. पोलीस स्टेशन येथून बाजारपेठेतून ढालकाठी पर्यंत व तेथून डीपी रोडने मुख्य चौकातून पोलीस स्टेशन असे हे संचलन करण्यात आले. यावेळी या संचलनाचे प्रतिनिधित्व पोलीस इन्स्पेक्टर तेजस नलावडे, यांच्या नेतृत्वाखाली. एपीआय नागेश चिकणे, पीएसआय महेश शेडगे, पीएसआय दशरथ चव्हाण, पीएसआय सोनवणे यांच्या सह साठ अंमलदार, यात सहभागी झाले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली,सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण या नगरपंचायत, नगरपरिषदाची मतमोजणी रविवार २१ डिसेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर हे पोलिस संचलन आज करण्यात आले.

You cannot copy content of this page