⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी वरून आरोस मार्गे सुटणारी सायंकाळची आरोंदा वस्तीची एसटी बस मागील काहींदिवस आरोंदा येथे वस्तीला जात नसल्याने येथील विद्यार्थ्यांची ,ग्रामस्थांची बरीच गैरसोय होत होती.
त्यामुळे आरोंदा ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी याबाबत सावंतवाडी एसटी डेपो येथील अधिकाऱ्यांशी चर्चा , पाठपुरावा करून संबंधित वस्तीची एसटी बस पूर्ववत करण्याची मागणी केली.त्यांच्या या मागणीला संबंधित अधिकाऱ्यांनी होकार दर्शवित सदरील एसटी बस पूर्ववत सुरू केली असून ही बस आता श्री देवी सातेरी भद्रकाली मंदिर शेजारी कन्या शाळेजवळ थांबणार आहे.तेथून ती सकाळी सावंतवाडीला जाण्यासाठी सुटणार असून,यामुळे येथील विद्यार्थ्यांची ,ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे.यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आरोंदा सरपंच सायली साळगांवकर, ग्रा.पं. सदस्य सुभाष नाईक,स्मिताली नाईक,शिल्पा नाईक, सुभद्रा नाईक,तंटामुक्त अध्यक्ष मनोहर आरोंदेकर,भाजप बूथ अध्यक्ष सुरेंद्र कामत ,एसटीचे चालक वाहक तसेच आरोंदा ग्रामस्थ उपस्थित होते.
सावंतवाडी आरोंदा वस्तीची बस पूर्ववत;ग्रामस्थात समाधान…
