कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेचे वनभोजन उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी तालुक्यातील कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये प्रशालेचे शैक्षणिक वर्ष सन २०२५-२०२६ चे वनभोजन काल शुक्रवारी वेत्ये-खांबलवाडी येथील संत शिरोमणी गोरोबा काका समाजमंदिर सभोवतालच्या परिसरात मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडले. शाळेतील मुलांनी विविध प्रकारचे खेळ खेळत वनभोजनाचा मनसोक्त आनंद लुटला. वनभोजनात सर्व मुलांसह शिक्षक व पालक यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.
वनभोजन स्थळी पोहोचताच सर्व मुलांनी व शिक्षकांनी सर्वप्रथम गोरोबा काकाचे दर्शन घेतले. त्यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मुलांनी क्रिकेट, कबड्डी, पकडापकडी, अंताक्षरी, हिंदी, मराठी तसेच इंग्लिश, मराठी शब्दांच्या भेंड्या आदी खेळ खेळत मनसोक्त आनंद लुटला. दुपारी सर्वांनी एकत्र येत सामूहिक भोजनाचा आनंद लुटला. वनभोजनात मुलांसमवेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, उपाध्यक्ष परशुराम पाटकर, मुख्याध्यापक शितल गाबित, शिक्षक अरविंद सरनौबत, रेश्मा गावडे, दीक्षा आडारकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भरत जाधव, कृतिका गावडे, सोनम पाटकर, एकता हरमलकर, महेश गावडे, अंगणवाडी सेविका एकता गावकर, सरस्वती गावकर, पालक प्रतिभा देऊलकर, मनाली गावकर, दीक्षा नाईक, इशिका पेडणेकर, सोनम पाटकर, गोविंद गावकर आदी सहभागी झाले होते. वनभोजन उपक्रमात सहभागी सर्व पालकांचे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page