पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिष्टाईनंतर देवगड जामसंडे जलवाहीनी दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू…

⚡देवगड ता.१९-:
देवगड जामसंडे नळ योजनेच्या मागील कामाचे ८९ लाख रूपये येणे असल्याने ठेकेदार अडून बसला होता. दुर्दैवाची बाब म्हणजे पाण्याचा गंभीर प्रश्न असूनही नगरसेवक व प्रशासन मुग गप्प गिळून होते. अखेर पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना दिल्या नंतर शुक्रवारी सकाळपासून दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू झाले असून
शहरातील जनतेला शनिवारपासून पाणीपुरवठा होणार आहे.

ठेकेदाराचे मागील ८९ लाख रूपये देणे बाकी असल्यामुळे जलवाहीनी दुरूस्त करण्यास त्यांनी दिलेला नकार व नगरसेवक , नगरपंचायत प्रशासन यांची पाणीप्रश्नाबाबत असलेली उदासीन भुमिका यामुळू जलवाहीनी फुटून दोन दिव होवूनही दुरूस्ती न झाल्यामुळे देवगड जामसंडेमधील नागरिकांचा गेले सहा दिवस पाणीपुरवठा बंद होता अखेर पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिष्टाईमुळे ठेकेदारांनी दुरूस्ती करण्यास शुक्रवारी सुरूवात केली.जलवाहीनी दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असून पाणीपुरवठा शनिवारपासून सुरू होणार आहे.

एकीकडे ९ कोटी २१ लाख रूपये निधी मंजुर झालेल्या नळपाणी पुरवठा योजना दुरूस्ती कामाचे पाईप टाकण्याचे काम पाच महिने उलटून गेले तरी सुरू झाले नाही तर दुसरीकडे सध्या वारंवार फुटणारी जलवाहीनी दुरूस्त करूनही पुन्हा फुटत असल्यामुळे देवगड जामसंडेमधील नागरिकांचे पाण्याचे हाल सुरू आहेत.बुधवारी दुपारी फुटलेली जलवाहीनी दुरूस्तीचे काम गुरूवारीही करण्यात आले नाही.ठेकेदार आपले मागील येणे आहे या भुमिकावर ठाम होता.नगरपंचायत प्रशासन व ठेकेदार यांच्या वादात मात्र सर्वसामान्य जनता भरडली. यामुळे नागरिकांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला व पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली.दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी यामध्ये शिष्टाई करून ठेकेदाराला सुचना दिल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सकाळपासुन दुरूस्तीचे काम सुरू केले असून शनिवारपासून पाणीपुरवठा सुरू होणार आहे.

You cannot copy content of this page