⚡मालवण, ता.१९-: श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ मालवण यांच्यावतीने श्री संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी सोहळा २० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कोळंब भटवाडी हडकर दुकान नजीक येथील अशोक (बबन) नेमळेकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
यानिमित्ताने संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघाचे अध्यक्ष मोहन वालकर, सचिव विनायक चव्हाण आणि खजिनदार कृष्णाजी परुळेकर यांनी या कार्यक्रमास सर्व समाजबांधवांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सल्लागार परिश्रम घेत आहेत.
मालवण येथे उद्या श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी सोहळा…
