⚡सावंतवाडी ता.१९-: शिंदे युवासेना सावंतवाडी तालुकाप्रमुख पदावर श्री. रियाज खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी जाहीर केली आहे.हे नियुक्तीपत्र आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब, यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष श्री. पुरवेशजी सरनाईक यांच्या विनंतीनुसार ही जबाबदारी देण्यात आली आहे.श्री. रियाज खान यांना बांदा, इन्सुली,मळेवाड,आरोंदा या भागाची त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे
