Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण पंचायत समिती येथे २९ रोजी तिमाही पेन्शन अदालत…

⚡मालवण ता.२३-:मालवण गट स्तरावर तिमाही पेन्शन अदालत सभा सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. पंचायत समिती कार्यालय, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सदर सभेस जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरून सेवानिवृत्त झालेल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी केले आहे.

Read Full News

कणकवली तालुका विधी सेवा समितीच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांची प्रभावी सामाजिक जनजागृती रॅली…

कणकवली : कणकवली तालुका विधी सेवा समितीच्या पुढाकारातून सामाजिक जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. कणकवली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी शुभम लटूरिया यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ५, कणकवली…

Read Full News

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मालवणात हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन…

⚡मालवण ता.२३-:बांगलादेश मध्ये हिंदू धर्मीय तरुणाला जिवंत जाळल्याप्रकरणी आणि तेथे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी दि. २४ डिसेंबर रोजी मालवण भरड नाका येथे सकाळी ११ वा. हिंदू बांधव भगिनींना एकत्र येण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल मालवण यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. बांगलादेश मधील हिंदूवर अनन्वित अत्याचार होत आहेत….

Read Full News

राष्ट्राच्या प्रगतीत कोकणी माणसाचं मोठं योगदान…

एन.डी.पाटील : निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या बौद्धीक चर्चासत्रात मार्गदर्शन.. ⚡देवगड ता.२३-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून आतापर्यतच्या राष्ट्राच्या प्रगतीत कोकणी माणसाच आणि या भूमीचं मोठे योगदान आहे. या भूमीने देशातील भारतरत्न घडविली आहेत. विद्यार्थ्यांनी इतिहास समजून घेऊन त्यातून आदर्श घ्यायला हवा. तरुणांनी शास्त्रालाआधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे असे मार्गदर्शन पुणे जिल्ह्याचे निवृत्त प्रमुख सरकारी…

Read Full News

डॉ. अमुल पावसकर यांना पहिला ‘आश्रम पुरस्कार’ जाहीर…

⚡बांदा ता.२४-: सावंतवाडी येथील स्वरूप हॉस्पिटलचे संचालक व सुप्रसिद्ध जनरल सर्जन डॉ. अमुल महादेव पावसकर यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय, सेवाभावी कार्याची दखल घेत श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज पॅरामुर (तेलंगणा) आणि बांदा परिवारातर्फे देण्यात येणारा पहिला ‘आश्रम पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल व ग्रंथ असे असून…

Read Full News

पीएमश्री केंद्र शाळा बांदा नं. १ चा १७२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.२३-: येथील पीएमश्री केंद्र शाळा बांदा नंबर १ चा १७२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचा ऐतिहासिक वारसा, तिची भव्य इमारत, आणि शाळेवर असलेली लोकांची अपार श्रद्धा आणि प्रेम यांचा गौरव करण्यात आला.शाळेचा ऐतिहासिक ठसा, प्रगतीची वळणं, आणि शाळेच्या विकासात लोकांची महत्त्वपूर्ण भूमिका यावर यावेळी भाष्य करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे…

Read Full News

बांदा केंद्रशाळेत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा…

⚡बांदा ता.२३-: महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याच औचित्याने पीएमश्री केंद्र शाळा बांदा क्रमांक १ येथे इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेचे उद्घाटन मार्गदर्शक विशाल मोहिते यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय सावळ यांनी केले, तर…

Read Full News

शिरोडा-वेळाघर येथील ताज समूहाच्या ‘५ स्टार’ हॉटेलबाबतच्या पूरक करार पत्रासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय…

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न:सामंजस्य करार आणि मोबदल्याचा प्रश्न निकाली, ग्रामस्थांना दोन टप्प्यांत मिळणार मोबदला.. ​⚡​वेंगुर्ले ता.२३-:सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी एक मोठे पाऊल पडले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा-वेळाघर येथे ताज समूहाच्या (मे. इंडियन हॉटेल कंपनी प्रा. लि.) वतीने जिल्ह्यातील पहिले आलिशान ‘५…

Read Full News

नवनिर्वाचित नगरसेविका अॅड. सायली दुभाषी यांनी माजी मंत्री प्रवीणभाई भोंसले यांची घेतली सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी ता.२३-:सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) यांच्या तिकिटावर नवनिर्वाचित झालेल्या नगरसेविका अॅड. सायली दुभाषी यांनी आज दुपारी सालईवाडा येथील माजी मंत्री प्रवीणभाई भोंसले व त्यांच्या पत्नी सौ. अनुराधा भोंसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पती काशिनाथ दुभाषी उपस्थित होते.या भेटीदरम्यान माजी मंत्री प्रवीणभाई भोंसले यांनी अॅड. सायली दुभाषी यांचे नवनिर्वाचनाबद्दल अभिनंदन केले….

Read Full News

स्वच्छता मोहिमेला मोठा प्रतिसाद…

शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य संस्थांचा सहभाग.. ओरोस ता २३जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत २० डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत, आरोग्यकेंद्र, आरोग्य उपकेंद्र व परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांत जिल्ह्यातील ३२ हजार ११८ व्यक्तींनी श्रमदान करुन ३ हजार ६२० किलो कचरा गोळा केला आहे. या कार्यक्रमांत ७९५ शाळा, २४५…

Read Full News

You cannot copy content of this page