राष्ट्राच्या प्रगतीत कोकणी माणसाचं मोठं योगदान…

एन.डी.पाटील : निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या बौद्धीक चर्चासत्रात मार्गदर्शन..

⚡देवगड ता.२३-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून आतापर्यतच्या राष्ट्राच्या प्रगतीत कोकणी माणसाच आणि या भूमीचं मोठे योगदान आहे. या भूमीने देशातील भारतरत्न घडविली आहेत. विद्यार्थ्यांनी इतिहास समजून घेऊन त्यातून आदर्श घ्यायला हवा. तरुणांनी शास्त्रालाआधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे असे मार्गदर्शन पुणे जिल्ह्याचे निवृत्त प्रमुख सरकारी वकील अँड. एन.डी.पाटील यांनी ओबळ येथे केले
शिरगांव येथिल पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ओंबळ येथे सुरु असलेल्या निवासी श्रमसंस्कार शिबीरातील बौद्धीक चर्चासत्रात अँड.पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष संभाजी साटम, गणपत तावडे, शाळा समिती सदस्य दिनेश साटम, प्राचार्य समिर तारी, ॲकॅडमिक कोऑर्डीनेटर प्राध्यापिका सिद्धी कदम, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी कोमल पाटील, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी अक्षता मोंडकर, प्राध्यापिका सुगंधा पवार, मयूरी कुंभार, सोनाली ताम्हणकर, आशय सावंत, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संभाजी पाटील आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अँड. पाटील पुढे म्हणाले, देशाला तिन्ही बाजूनी समुद्र लाभला आहे. स्वराज्यासाठी नौदलाची स्थापना हा सुवर्णक्षण होता. आशिया खंडात देश प्रगत असल्याचे श्रेय भारतीय नौदलाचे पितामह छत्रपती शिवाजी महारांजांना जात. हिंदवी स्वराज्य हे मराठी माणसांच होत तेथेजाती-पाती भेदा-भेद, अंधश्रध्देला थारा नव्हता मुळातच तेथे समतेचा विचार महारांजांनी रुजविलेला होता. भेदा-भेदाने प्रगती खुंटते. सकारात्मक प्रगतशिल विचारांची कास धरा.यश तुमचंच आहे.
इंग्रजांनी जगातील ६५ देशांवर राज्य केले कारण त्यांच्याकडे स्वतःची शिस्त होती. प्रगत तंत्रज्ञान होत.आजच्या तरुण पदवी बरोबरच तंत्रज्ञानावर आधारीत व्यावसायिक शिक्षण घेणे काळाची गरज आहे.
अध्यक्षीय भाषणात गणपत तावडे म्हणाले. संस्थेने विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.पंचक्रोशीतील ग्रामस्थाचं सहकार्यही लाभले आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती करत असताना शिस्त पाळायला हवी. कष्टाशिवाय फळ नाहीं.असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साक्षी शिद्रक हिने केले तर आभार अक्षय हिर्लेकर याने मानले.

You cannot copy content of this page