पीएमश्री केंद्र शाळा बांदा नं. १ चा १७२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.२३-: येथील पीएमश्री केंद्र शाळा बांदा नंबर १ चा १७२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचा ऐतिहासिक वारसा, तिची भव्य इमारत, आणि शाळेवर असलेली लोकांची अपार श्रद्धा आणि प्रेम यांचा गौरव करण्यात आला.
शाळेचा ऐतिहासिक ठसा, प्रगतीची वळणं, आणि शाळेच्या विकासात लोकांची महत्त्वपूर्ण भूमिका यावर यावेळी भाष्य करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी हेमंत मोर्ये, संतोष बांदेकर, मुख्याध्यापक शांताराम असनकर, माजी विद्यार्थी नंदू बांदेकर यांच्यासह प्रशाळेतील शिक्षक उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून श्री आगलावे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अखेरीस शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन १७२ वा वर्धापनदिन केक कापून साजरा केला. यावेळी शाळेच्या वतीने मुलांना लाडू वाटण्यात आले.
गतवर्षी सावंतवाडी येथील मठकर कुटुंबीयांनी शाळेच्या किचन शेड इमारतीचे पूर्ण बांधकाम करून आदर्श निर्माण केला. त्यांच्या या योगदानाचा आदर्श इतरांनी घेत शाळेच्या विकासामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
फोटो:-
बांदा केंद्रशाळेचा वर्धापन दिन मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

You cannot copy content of this page