नवनिर्वाचित नगरसेविका अॅड. सायली दुभाषी यांनी माजी मंत्री प्रवीणभाई भोंसले यांची घेतली सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी ता.२३-:
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) यांच्या तिकिटावर नवनिर्वाचित झालेल्या नगरसेविका अॅड. सायली दुभाषी यांनी आज दुपारी सालईवाडा येथील माजी मंत्री प्रवीणभाई भोंसले व त्यांच्या पत्नी सौ. अनुराधा भोंसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी त्यांच्यासोबत पती काशिनाथ दुभाषी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान माजी मंत्री प्रवीणभाई भोंसले यांनी अॅड. सायली दुभाषी यांचे नवनिर्वाचनाबद्दल अभिनंदन केले.

तसेच सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक स्वर्गीय सतीश दुभाषी यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रामाणिक व समर्पित जनसेवा करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढील कार्यकाळासाठी त्यांनी अॅड. दुभाषी यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या सदिच्छा भेटीत सौहार्दपूर्ण वातावरणात सामाजिक व नगरविकासासंबंधी विविध विषयांवरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

You cannot copy content of this page