स्वच्छता मोहिमेला मोठा प्रतिसाद…

शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य संस्थांचा सहभाग..

ओरोस ता २३
जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत २० डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत, आरोग्यकेंद्र, आरोग्य उपकेंद्र व परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांत जिल्ह्यातील ३२ हजार ११८ व्यक्तींनी श्रमदान करुन ३ हजार ६२० किलो कचरा गोळा केला आहे. या कार्यक्रमांत ७९५ शाळा, २४५ आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र तर ३९६ ग्रामपंचायत कार्यालयानी सहभाग घेतला आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रविद्र खेबुडकर यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वच्छ जिल्हा म्हणुन देशात प्रसिध्द आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती होण्याकरीता २० डिसेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत, आरोग्यकेंद्र, आरोग्य उपकेंद्र व परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय स्वच्छता कार्यक्रमांत शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी वर्ग खोल्याची साफसफाई, शाळा परिसर स्वच्छता आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. तर ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छता कार्यक्रमांत ग्रामपंचायत कार्यालय व परिसर स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच अभिलेख वर्गिकरण, अधिकारी व कर्मचारी यांची टेबल, कपाट स्वच्छता, ग्रामपंचायत कार्यालय निटनेटके करणे, दिशादर्शक बोर्ड लावणे, रंगरगोटी करणे आदी कार्यक्रमांचे समावेश करण्यात आला होता. आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र स्वच्छता कार्यक्रमांत कार्यालय व परिसर स्वच्छत, रंगरगोटी श्रमदानाच्या माध्यमातुन करणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांत जिल्हा वासियांनी उस्फूर्त प्रतिसाद देत श्रमदान केले आहे. शाळा व शाळा परिसर स्वच्छता कार्यक्रमांत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ७९५ शाळानी सहभाग घेतला होता. २६ हजार ७६१ व्यक्तींनी श्रमदान करुन एक हजार ५८४ किलो कचरा एकत्र केला आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील ९९ शाळांनी सहभाग घेत ३ हजार ३९१ जणांच्या श्रमदानातुन २७५ किलो कचरा एकत्र केला आहे. कणकवली तालुक्यातील २६४ शाळांनी सहभाग घेत १२ हजार ६६३ व्यक्तींच्या श्रमदानातुन २७३ किलो कचरा एकत्र केला आहे. वैभववाडी तालुक्यातील ५९ शाळांनी सहभाग घेत १ हजार ८०१ जनांच्या श्रमदानातुन १०७.५० किलो कचरा एकत्र केला आहे. मालवण तालुक्यातील १०५ शाळांनी सहभाग घेत ३ हजार १६१ जनांच्या श्रमदानातुन ४४१ किलो कचरा एकत्र केला आहे. कुडाळ तालुक्यातील २२ शाळांनी सहभाग घेत २०१ जनांच्या श्रमदानातुन ४० किलो कचरा एकत्र केला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील ५३ शाळांनी सहभाग घेत १ हजार ९० जनांच्या श्रमदानातुन ७१ किलो कचरा एकत्र केला आहे. सावंतवाडी तालुक्यातील १०१ शाळांनी सहभाग घेत २ हजार ९८८ जनांच्या श्रमदानातुन १२५ किलो कचरा एकत्र केला आहे. दोडामार्ग तालुक्यातील ९२ शाळांनी सहभाग घेत १ हजार ४६६ जनांच्या श्रमदानातुन १४२ किलो कचरा एकत्र केला आहे.
आरोग्यकेंद्र, उपकेंद्र व परिसर स्वच्छता कार्यक्रमांत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २४५ आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत १ हजार ८५२ जनांनी श्रमदान करुन ८०४.६५ किलो कचरा एकत्र केला आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील ४५ आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत ३४३ जनांच्या श्रमदानातुन १७४ किलो कचरा एकत्र केला आहे. कणकवली तालुक्यातील ४५ आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत ३१४ जनांच्या श्रमदानातुन १८ किलो कचरा एकत्र केला आहे. वैभववाडी तालुक्यातील १६ आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत १०४ जनांच्या श्रमदानातुन ६६ किलो कचरा एकत्र केला आहे. मालवण तालुक्यातील ३९ आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत २५४ जनांच्या श्रमदानातुन ७२ किलो कचरा एकत्र केला आहे. कुडाळ तालुक्यातील ३२ आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत २३८ जनांच्या श्रमदानातुन ५५ किलो कचरा एकत्र केला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील २७ आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत ३०४ जनांच्या श्रमदानातुन २१७.५० किलो कचरा एकत्र केला आहे. सावंतवाडी तालुक्यातील २२ आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत १८४ जनांच्या श्रमदानातुन १२३ किलो कचरा एकत्र केला आहे. दोडामार्ग तालुक्यातील १९ आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत १११ जनांच्या श्रमदानातुन ७८ किलो कचरा एकत्र केला आहे.
ग्रामपंचायत व परिसर स्वच्छता कार्यक्रमांत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३९६ ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत ३ हजार ५०५ जनांनी श्रमदान करुन एक हजार १३१ किलो कचरा एकत्र केला आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील ५२ ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत ८१२ जनांच्या श्रमदानातुन २१७.५ किलो कचरा एकत्र केला आहे. कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत ४७४ जनांच्या श्रमदानातुन १०२.५ किलो कचरा एकत्र केला आहे. वैभववाडी तालुक्यातील ३५ ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत ३१८ जनांच्या श्रमदानातुन ६६ किलो कचरा एकत्र केला आहे. मालवण तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत ४३५ जनांच्या श्रमदानातुन १८५.५ किलो कचरा एकत्र केला आहे. कुडाळ तालुक्यातील ५२ ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत ४९१ जनांच्या श्रमदानातुन १४२ किलो कचरा एकत्र केला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील ३० ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत ४०२ जनांच्या श्रमदानातुन ३३५ किलो कचरा एकत्र केला आहे. सावंतवाडी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत ३८९ जनांच्या श्रमदानातुन ४७ किलो कचरा एकत्र केला आहे. दोडामार्ग तालुक्यातील ३६ ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत १८४ जनांच्या श्रमदानातुन १३५ किलो कचरा एकत्र केला आहे अशी माहिती रविद्र खेबुडकर यांनी दिली आहे.

फोटो ओळ: ओटवणे: मोहीम अंतर्गत ओटवणे ग्रामपंचायत इमारत व परिसर स्वच्छता करताना
२)मालवण: मालवण पंचायत समितीत परिसर स्वच्छता मोहीम राबविताना कर्मचारी

You cannot copy content of this page