Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्लावासिय नागरिकांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी क्रियाशील रहा…

ना. नितेश राणे: नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा केला सत्कार.. ⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्लेवासीय नागरिकांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी नवनिर्वाचित भाजपा टीमने पुढील पाच वर्षे क्रियाशील रहावे. जनतेचे प्रश्न सोडविणे हे तुमचे ध्येय असून संघटना वाढीबरोबरच घराघरात कमळ जाईल, अशा पद्धतीने एकदिलाने सर्वांनी काम करा. वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी निश्चितच निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री…

Read Full News

लाखेवस्ती समाजातर्फे नवनिर्वाचित नगरसेवक संजू परब व बाबू कुडतरकर यांचा केला जाहीर सत्कार…

⚡सावंतवाडी ता. २९-:येथील लाखेवस्ती समाजाच्या वतीने शिंदे शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक बाबू कुडतुरकर व संजू परब यांचा आज जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मांडण्यात आल्या असून त्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी अपेक्षा समाजबांधवांनी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक बाबू कुडतुरकर व संजू परब यांनी समाजाला आश्वस्त करत सांगितले की, लाखेवस्ती समाजाला दिलेले सर्व…

Read Full News

भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा मंत्री नितेश राणे यांनी केला सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी शहरात भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार आज भाजप कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील पाच वर्षांत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य नियोजन व पारदर्शक कारभार करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल मंत्री नितेश राणे…

Read Full News

सावंतवाडीकरांना निवडणुकीत दिलेले शब्द पुढील पाच वर्षात पूर्ण करणार…

मंत्री नितेश राणे: उपनगराध्यक्ष पदाचा निर्णय लवकरच होईल, तर सावंतवाडीचा तलाव इथेच राहणार.. ⚡सावंतवाडी, ता. २९-:सावंतवाडीकरांनी आमच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल सर्व सावंतवाडीवासीयांचे मनापासून आभार मानतो. निवडणुकीदरम्यान दिलेले प्रत्येक शब्द नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास राज्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला देतो, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले….

Read Full News

गांधी विचार दर्शन पदविका परीक्षेत प्रसन्न सोनुर्लेकरचे सुयश…

⚡सावंतवाडी ता.२९-: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या गांधी विचार दर्शन पदविका परीक्षेत सावंतवाडी येथील आरपीडी कॉलेज कॅम्पस मधील डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज अभ्यास केंद्राचा विद्यार्थी प्रसन्न प्रदीप सोनुर्लेकर याने उल्लेखनीय यश संपादन करत विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण होत पदविका प्राप्त केली.प्रसन्न सोनुर्लेकर याने जगभरातील समकालीन सामाजिक‌ आणि राजकीय चळवळींमध्ये…

Read Full News

कणकवलीत शहर विकास आघाडीचा स्वतंत्र गट स्थापन…

बाळकृष्ण नार्वेकर गटनेते:जिल्हाधिकाऱ्यांना पत्र सादर.. ओरोस ता २९कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत क्रांतिकारी विचार पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून विजयी झालेल्या थेट नगराध्यक्ष यांच्यासह आठ नगरसेवकांनी कणकवली नगरपंचायत शहर विकास आघाडी गट २०२५ या नावाने गट स्थापन केला आहे. त्याचे पत्र सोमवारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना देण्यात आले आहे. या गटाच्या प्रमुख पदी प्रभाग १४ मधून निवडून…

Read Full News

वाळू उत्खनन आणि उपलब्धतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूची उपलब्धता आणि प्रलंबित लिलाव प्रक्रियेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बरडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक व कंत्राटदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीत वाघोठण नदी आणि विजयदुर्ग खाडीमधील प्रलंबित वाळू लिलाव…

Read Full News

तळेरे येथील खटावकर कुटुंबीयांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले सांत्वन…

कणकवली : तालुक्यातील तळेरे येथील माजी सभापती वंदना खटावकर यांच्या सुनबाई प्रीती खटावकर यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. या दुःखद घटनेनंतर पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी खटावकर कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत या दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते…

Read Full News

जिल्हा पत्रकार संघाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर…

६ जानेवारी रोजी होणार वितरण सोहळा.. ओरोस ता २९सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आले. ६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. पत्रकार संघाच्या सोमवारी झालेल्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत या निवडी निश्चित करण्यात आल्या.जिल्हा पत्रकार संघाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार निवडीनंतर पत्रकार परिषदेत जिल्हा पत्रकार…

Read Full News

वाळू डंपर अडवून खंडणी मागणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा…

शिंदे शिवसेनेची मागणी: अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा दिला इशारा.. ⚡मालवण ता.२९-:दोन दिवसापूर्वी मालवण शहरातील सागरी महामार्गावर नागरिकांनी वाळू वाहतूक करणारे डंपर अडविल्यावर ते महसूल प्रशासनाने ताब्यात घेतले असताना सदर नागरिकांनी खंडणी उकळण्याच्या उद्देशाने बळजबरीने डंपर अडवल्याचा आरोप आज शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करत वाळू वाहतूक रोखणे हे महसूल विभाग व पोलीसांचे काम असताना नागरिकांडून असे…

Read Full News

You cannot copy content of this page