लाखेवस्ती समाजातर्फे नवनिर्वाचित नगरसेवक संजू परब व बाबू कुडतरकर यांचा केला जाहीर सत्कार…

⚡सावंतवाडी ता. २९-:
येथील लाखेवस्ती समाजाच्या वतीने शिंदे शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक बाबू कुडतुरकर व संजू परब यांचा आज जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मांडण्यात आल्या असून त्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी अपेक्षा समाजबांधवांनी व्यक्त केली.

यावेळी नगरसेवक बाबू कुडतुरकर व संजू परब यांनी समाजाला आश्वस्त करत सांगितले की, लाखेवस्ती समाजाला दिलेले सर्व शब्द आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील. समाजाच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व बाबींसाठी आपण कटिबद्ध असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page