कणकवलीत शहर विकास आघाडीचा स्वतंत्र गट स्थापन…

बाळकृष्ण नार्वेकर गटनेते:जिल्हाधिकाऱ्यांना पत्र सादर..

ओरोस ता २९
कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत क्रांतिकारी विचार पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून विजयी झालेल्या थेट नगराध्यक्ष यांच्यासह आठ नगरसेवकांनी कणकवली नगरपंचायत शहर विकास आघाडी गट २०२५ या नावाने गट स्थापन केला आहे. त्याचे पत्र सोमवारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना देण्यात आले आहे. या गटाच्या प्रमुख पदी प्रभाग १४ मधून निवडून आलेल्या राधाकृष्ण नार्वेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
२ डिसेंबर २०२५ रोजी कणकवली नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडून पार पडली. या निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्व पक्षीय मिळून क्रांतिकारी विचार पक्ष अशी एकास एक निवडून झाली होती. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. हा निकाल धक्कादायक लागला होता. सर्वपक्षीय पॅनेलचे उमेदवार संदेश पारकर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. तर आठ नगरसेवक निवडून आले. भाजपचे नऊ नगरसेवक निवडून आले. यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांना धक्का बसला होता.
आता भविष्यात सर्व पक्षीय पॅनल मधून निवडून आलेल्या नगरसेवकांची फोडाफोडी होऊ नये, यासाठी राजकीय खबरदारी घेण्यात आली आहे. नगराध्यक्ष पारकर यांच्यासह आठ नगरसेवकांनी कणकवली नगरपंचायत शहर विकास आघाडी गट २०२५ या नावाने गट स्थापन केला आहे. यात नगराध्यक्ष संदेश पारकर, गटनेते राधाकृष्ण नार्वेकर, नगरसेवक सुशांत नाईक, जयेश धुमाळे, सुमेधा अंधारी, जाई मुरकर, संकेत नाईक, लुकेश कांबळे, वैष्णवी सरमळकर उर्फ दीपिका जाधव यांची नावे आहेत.

फोटो ओळ: सिंधुदुर्गनगरी:

You cannot copy content of this page