कणकवली : तालुक्यातील तळेरे येथील माजी सभापती वंदना खटावकर यांच्या सुनबाई प्रीती खटावकर यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. या दुःखद घटनेनंतर पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी खटावकर कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत या दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खटावकर कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत सर्वांनीच कै. प्रीती खटावकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
