सावंतवाडीकरांना निवडणुकीत दिलेले शब्द पुढील पाच वर्षात पूर्ण करणार…

मंत्री नितेश राणे: उपनगराध्यक्ष पदाचा निर्णय लवकरच होईल, तर सावंतवाडीचा तलाव इथेच राहणार..

⚡सावंतवाडी, ता. २९-:
सावंतवाडीकरांनी आमच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल सर्व सावंतवाडीवासीयांचे मनापासून आभार मानतो. निवडणुकीदरम्यान दिलेले प्रत्येक शब्द नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास राज्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला देतो, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले.

ते म्हणाले की, शहरातील जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते महायुती सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे सोडवले जातील. उपनगराध्यक्षपदाबाबत चा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. तोपर्यंत माध्यमांनी आपले काम सुरू ठेवावे, अशी मिश्किल प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली.

सावंतवाडी शहरातील विविध समस्या पुढील पाच वर्षांत नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लावण्यात येतील. त्यासाठी शासनाकडून त्यांना पूर्ण ताकद व पाठबळ दिले जाईल. पुढील पाच वर्षे सावंतवाडीकरांच्या सेवेत कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले.
यावेळी त्यांनी सावंतवाडीचा तलाव इथेच राहणार असल्याचा टोला , नाव न घेता संजू परब यांच्यावर अप्रत्यक्षत लगावला.

You cannot copy content of this page