जलजीवन मिशन अंतर्गत मालवण पंचायत समितीमध्ये प्रशिक्षण शिबीर संपन्न…!
⚡मालवण ता.२४-:जल जीवन मिशन अंतर्गत टप्पा-३ (स्तर-३) मध्ये समाविष्ट पात्र ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींना उद्देशून, पंचायत समिती मालवणच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे पार पडले. या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि जेपीएस फाउंडेशन, लखनौ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी जल स्रोतांचे योग्य…
