Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ला आगारात सुरक्षितता अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.१४-: भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ यांच्या माध्यमातून वेंगुर्ले आगारात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुरक्षितता अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर संपन्न झाले. यावेळी गद्रे नेत्र रुग्णालयाचे नेत्र चिकित्सक उदय दाभोलकर , तसेच एकदंत डेंटल क्लिनिक च्या दंत चिकित्सक डाॅ. तन्वी गोडकर व त्यांच्या टीमने तपासणी केली. या…

Read Full News

खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत १६ जानेवारी रोजी महायुतीची संयुक्त बैठक…

⚡सिंधुदुर्ग दि.१४-: जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.१६ जानेवारी २०२६ रोजी कणकवली प्रहार भवनामधील स्वामी विवेकानंद सभागृहात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक दुपारी २ वा. आयोजित करण्यात आली आहे.महायुतीच्या या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे आणि कुडाळ-मालवणचे आ.निलेश राणे, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर,…

Read Full News

भाजपाप्रणित सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार अध्यक्षपदी प्रसन्ना देसाई…

आगार कार्याध्यक्षपदी विष्णू उर्फ पप्पू परब यांची निवड.. ⚡वेंगुर्ला ता.१४-: भाजपाप्रणित सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार २०२६ ची कार्यकारीणी निवड करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांची आगार अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर आगार कार्याध्यक्षपदी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांची निवड करण्यात आली. वेंगुर्ला…

Read Full News

जिल्हा नेतृत्वाच्या ‘अकार्यक्षम’ कारभारामुळे मालवणात भाजपची पिछेहाट…

बाबा मोंडकर यांचा मालवण मंडल अध्यक्षासह भाजप सदस्यत्वाचा राजीनामा.. ⚡मालवण ता.१४-:गेली २२ वर्षे भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून प्रतिकूल परिस्थितीत संघटना वाढवणारे भाजपचे मालवण मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. मालवण नगरपालिका निवडणुकीत मालवण शहरातील भाजपच्या टीमला थांबवून जिल्हा नेतृत्वाकडून एक वेगळीच…

Read Full News

ॲड. अनिल निरवडेकर यांना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिल्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१४-: भाजपचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर यांना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी नारायण सावंत, बावतीस फर्नांडिस, मनोज घाटकर, सुंदर गावडे, सत्यम सावंत, ड्यूमिंग अल्मेडा, मयूर लाखे,मायकल माडतीस,अजू शेख, तर सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव,लक्ष्मण कदम उपस्थित होते.

Read Full News

सह्याद्रीतील गावांचे रक्षण; स्टॅलीन दयानंदांचा कोलझर भेटीवेळी संदेश…

दोडामार्ग :दिल्ली लॉबीच्या माध्यमातून सह्याद्रीतील गावांची जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणारे तथाकथित गुंतवणूकदार म्हणजे या भागाला लागलेली कीड असून ती मुळापासून उखडून टाकली पाहिजे, असा घणाघात वनशक्ती संस्थेचे प्रमुख स्टॅलीन दयानंद यांनी कोलझर येथे केला.कोलझर ग्रामस्थांनी “रक्ताच्या नात्याबाहेर कोणालाही जमीन विकणार नाही” असा ठाम निर्णय घेतला असून या लढ्यात पंचक्रोशीतील सर्व गावांच्या पाठीशी उभे राहण्याची…

Read Full News

दोडामार्गचा हत्ती उपद्रव न्यायालयात; प्रवीण गवस आक्रमक…

२३ वर्षांच्या हत्ती उपद्रवाला निर्णायक वळण; पकड मोहिमेसाठी न्यायालयीन लढा… दोडामार्ग :दोडामार्ग तालुक्यात गेल्या २३ वर्षांपासून सुरू असलेल्या हत्ती उपद्रवावर तोडगा काढण्यासाठी हत्ती पकड मोहिमेसाठीचा लढा आता न्यायालयात जाणार आहे. मुख्य वनसंरक्षक (कोल्हापूर) यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी थेट न्यायालयात दावा दाखल करण्याचा ठाम निर्धार जाहीर केला.यावेळी…

Read Full News

गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू यांची सावंतवाडी राजवाड्याला भेट…

⚡सावंतवाडी ता.१४-:गोव्या राज्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हे खासगी दौर्यानिमित्त सावंतवाडी राजवाड्याला भेट दिली. यावेळी त्यांचे संस्थांनचे राजे खेमसावंत भोसले राणीसाहेब सत्त्वशिलादेवी भोसले व युवराज लखमराजे भोसले यांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या. श्री. गजपती राजू हे बराच वेळ सावंतवाडी राजवाड्यामध्ये होते त्यांनी राजवाडा व संस्था संदर्भातील माहिती यावेळी जाणून घेतली.

Read Full News

निवडणूक निर्णय अधिकारी नितीन राऊत यांच्याकडून पथकांचा आढावा…

⚡देवगड ता.१४-: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ जाहीर होताच देवगड तालुका जि.प.पं. सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग नितीन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विविध प्रकारची २९ पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकात नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी पथकप्रमुख म्हणून कामकाज पाहणार असून प्रत्येक…

Read Full News

सिंधुदुर्गातील शासकीय भरतीत स्थानिक तरुणांवर अन्याय…?

परजिल्ह्यातील उमेदवारांची भरती वाढल्याचा आरोप.. ⚡मालवण,ता.१४-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतील भरती प्रक्रियेत स्थानिक सुशिक्षित तरुणांना डावलून परजिल्ह्यातील उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर वर्णी लागत असल्याचा गंभीर आरोप करत जिल्ह्यातील नागरिकांनी आणि सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. “सिंधुदुर्ग जिल्हा हा परजिल्ह्यातील उमेदवारांसाठी केवळ नोकरी मिळवण्याचे साधन म्हणजेच सोन्याची अंडी देणारी कोंबडी बनला आहे का?” असा संतप्त प्रश्न…

Read Full News

You cannot copy content of this page