Headlines

Global Maharashtra Breaking News

वेतोरे श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन दादा सारंग यांचा प्रचाराचा शुभारंभ…

⚡वेंगुर्ला ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाकडून सखाराम उर्फ दादा सचिन सारंग हे महायुती व ठाकरे शिवसेना उमेदवार यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. दादा सारंग यांनी‌ आज रविवारी 1 फेब्रुवारी रोजीवेतोरे ग्रामदेवता श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन…

Read Full News

केंद्रीय अर्थसंकल्प थोडी ख़ुशी थोडी गम ; एम. के. गावडे…

⚡वेंगुर्ला ता.०१-: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प 2026 म्हणजे थोडी ख़ुशी – थोडी गम असेच म्हणावे लागेल. दरम्यान कोकणासाठी कृषिसाठी स्वतंत्र पॅकेज ची घोषणा आवश्यक व अपेक्षित होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा कृषिभूषण एम. के. गावडे यांनी वेंगुर्ला येथे बोलताना व्यक्त केली. श्री. गावडे म्हणाले,…

Read Full News

सतीश सावंत यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश…

मंत्री नितेश राणें यांच्या उपस्थितीत प्रवेश:ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का.. ⚡कणकवली ता.०१- ठाकरे शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला असून, सतीश सावंत यांनी अखेर पालकमंत्री तथा भाजप नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश कणकवली–हरकूळ बु. येथील ‘कोकण रिट्रीट हॉल’ येथे पार पडला.नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या झंझावातामुळे उबाठा…

Read Full News

संजू परब यांचा उबाठाला मोठा धक्का…

आंबोलीतील उबाठा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.. ⚡ आंबोली ता.०१-:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आंबोली परिसरात मोठे बळ मिळाले असून उबाठा गटाला जोरदार धक्का बसला आहे. आंबोली जिल्हा परिषद गटातील उबाठा पक्षाचे उपविभाग प्रमुख बुधाजी पाताडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.हा पक्षप्रवेश पक्ष निरीक्षक राजेश मोरे यांच्या हस्ते व…

Read Full News

मालवणात उद्या वीर परिवार सहायता योजना माहिती सत्र…

⚡मालवण ता.०१-:राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणमार्फत वीर परिवार सहायता योजना २०२५ अंतर्गत संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना कायदेविषयक बाबींमध्ये मोफत व सक्षम कायदेशीर सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच योजनेबाबत माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी…

Read Full News

चौके येथे उद्या धार्मिक कार्यक्रम…

⚡मालवण ता.०१-:चौके कुळकरवाडी येथील श्री दत्त मंदिर या ठिकाणी श्री गुरू प्रतिपदा उत्सव व श्री गणेश, श्री दत्त, प. पू. भालचंद्र महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा २३ वा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. २ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ८ ते ११ पालखी मिरवणूक, सकाळी ११ ते दुपारी १२ श्रींची पूजा, दुपारी १२….

Read Full News

मालवणात १०९ कर्मचाऱ्यांनी केले मतदान…

⚡मालवण ता.०१-:मालवण तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेत सहभागी शासकीय कर्मचाऱ्यांनी शनिवारी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण याठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पहिले मतदान केले. यासाठी नाट्यगृह याठिकाणी खास मतदान कक्ष स्थापन करण्यात आला होता. ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यामध्ये शासकीय कर्मचारी मतदान केंद्रावर अधिकारी म्हणून नियुक्त असल्याने त्यांना टपाली मतदानाचा अधिकार उपलब्ध करून देण्यात आला…

Read Full News

तरुणांना संधी देणारा आणि शाश्वत विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प…

विजय केनवडेकर:उद्योजकतेला बळ मिळून रोजगारनिर्मितीला गती मिळेल.. ⚡मालवण ता.०१-:केंद्र सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प तरुणांना प्रोत्साहन देणारा असून, मागील चार अर्थसंकल्पांतील धोरणांची सुसंगत पुढची पायरी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते मागील अर्थसंकल्पांमध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी ज्या तरतुदी करण्यात आल्या होत्या, त्याचाच विस्तार करत या अर्थसंकल्पात शाश्वत विकासावर विशेष भर देण्यात आल्याने तरुणांना संधी देणारा आणि…

Read Full News

मसुरे मतदार संघात उबाठा शिवसेनेच्या उमेदवारांचा घरोघरी प्रचारावर जोर…

⚡मालवण ता.०१-:मसुरे जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ. आनंदी आबा परब आणि मसुरे पंचायत समिती मतदार संघांचे उमेदवार वैभव सुरेश चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ मसुरे टोकळवाडी येथे करण्यात आला. या प्रचारादरम्यान उबाठा शिवसेना पक्षाच्या उमेदवार सौ. आनंदी परब व वैभव चव्हाण यांनी घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप करून या भागाच्या…

Read Full News

जे काही बोलेन ते निवडणुकीनंतर, आता केवळ विकासाच्या माध्यमातूनच बोलेन…

सुदन उर्फ सुधा कवठणकर:सातार्डा येथे ग्रामदेवतांच दर्शन घेऊन प्रचाराचा केला शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.०१-:आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी आपल्या प्रचाराचा श्रीगणेश अत्यंत उत्साहात केला आहे. सातार्डा येथील ग्रामदैवत श्री देव रवळनाथ चरणी नतमस्तक होऊन आणि विजयाचा कौल मागत श्रीफळ वाढवून…

Read Full News

You cannot copy content of this page