Headlines

Global Maharashtra Breaking News

आरोंदा येथे चार चाकी गाडीला अपघात ,एकजण गंभीर…

⚡सावंतवाडी ता.१६-: आरोंदा आदर्श नगर येथे आज सकाळी सव्वा आठ च्या सुमारास अपघात घडला.आरोंद्यावरून आगराळ च्या दिशेने जाणाऱ्या चार चाकी वाहन गटारात गेल्याने अपघात घडला.यावेळी गाडीतून दोघे प्रवासी प्रवास करत होते यातील एक गंभीर असून दुसरा जखमी आहे.दोघेही आरोंदा आग्राळ वाडी येथील रहिवासी असून,अपघात घडल्याची माहिती मिळताच तत्काळ तेथे ग्रामस्थ, पोलीस, पोलीस पाटील दाखल होत…

Read Full News

‘जिवा माइन्स अँड मिनरल्स’वर ईडीची कारवाई…

⚡बांदा ता.१६-:​गोव्यातील लोहखनिज खाणींच्या नावाखाली एका चिनी कंपनीला १३ कोटी ४२ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या ‘जिवा माइन्स अँड मिनरल्स लिमिटेड’ विरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे.या फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथील दोन भूखंड आणि मुंबईतील एक आलिशान फ्लॅट अशी एकूण २ कोटी २९ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने तात्पुरती…

Read Full News

वैश्य वाणी युवा संघटनेतर्फे कॅन्सर रुग्णालयाला देणगी…

⚡सावंतवाडी, ता.१६-: समाजोपयोगी उपक्रमांना सातत्याने प्राधान्य देत वैश्य वाणी युवा संघटना यांच्या वतीने आज कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला. संघटनेतर्फे कॅन्सर हॉस्पिटलला देणगी स्वरूपात रुपये १० हजारांचा धनादेश प्रदान करण्यात आला. गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत व्हावी आणि समाजात सेवाभाव वाढावा या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील काळातही अशा…

Read Full News

मुक्ताई ॲकेडमीची साक्षी रामदुरकर जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत मुलींच्या गटात विजेती…

⚡सावंतवाडी ता.१६-: कुंभवडे ग्रामस्थ संघ, मुंबई आणि शंकर महादेव सावंत ग्रामविकास संस्था, मुंबई संचालित शंकर महादेव विदयालय, कुंभवडे गुरुकुल व सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्यातर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा कणकवली येथील कुंभवडे गावातील शंकर महादेव विदयालयात गुरुवार दि.12 व शुक्रवार दि.13 फेब्रुवारी या दोन दिवसात घेण्यात आली. कुंभवडे गावात प्रथमच अशा…

Read Full News

आंजीवडे घाटमार्गासाठी मिशन मोड मध्ये काम करण्याचा निर्धार…

आंजीवडे घाट कृती समितीची बैठक.. ⚡कुडाळ ता.१६-: सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना सर्वात कमी अंतराने जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित आंजिवडे–पाटगाव घाट मार्गासाठी आता सर्वांनी एकत्रितपणे मिशन मोडमध्ये काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. “राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून समन्वयातून काम करा; जनमताशिवाय विकास होत नाही. या घाटासाठी बेरजेचे राजकारण करूया,” असे ठाम मत मान्यवरांनी व्यक्त केले. येत्या…

Read Full News

कसाल केंद्रातील प्राथमिक शिक्षकांचा चेतना मेळावा उत्साहात…

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.१६-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ यांच्या वतीने शनिवारी कुडाळ तालुक्यातील कसाल केंद्रामध्ये केंद्रस्तरीय चेतना मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याचे पूर्ण नियोजन केंद्र संघटक संतोष तेरसे सर व त्यांच्या केंद्रातील सर्व शिक्षकांनी उत्कृष्टरित्या केले.केंद्रस्तरीय मेळाव्यामुळे सर्व शिक्षकांशी तालुका संघटनेचा संपर्क अधिक दृढ व…

Read Full News

कसाल येथील फुफ्फुसविकार तज्ञ डॉ. प्रशांत कोलते यांना पित्रृशोक

सेवानिवृत्त पोष्टमास्तर राजाराम कोलते यांचे निधन.. ⚡वैभववाडी ता.१५-: करुळ गावचे रहीवाशी व सेवानिवृत्त पोस्टमास्तर राजाराम गंगाराम कोलते वय 84 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. फुफ्फुसविकार विशेषज्ञ डॉ. प्रशांत कोलते तसेच वैभववाडी येथील स्वरगंगा इलेक्ट्रिशियन चे मालक संतोष कोलते यांचे ते वडील होत.राजाराम कोलते यांनी भारतीय पोस्ट खात्यात तब्बल तीस वर्ष सेवा बजावली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील…

Read Full News

मालवणमध्ये श्री स्वामी समर्थ पादुकांचे पूजन संपन्न…

⚡मालवण ता.१५-:मालवण शहरातील अॅड. उल्हास कुळकर्णी यांच्या निवासस्थानी अक्कलकोट येथून आणलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे पूजन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. चोळप्पा महाराज यांचे वंशज श्री वेदमूर्ती नितीन महाराज यांच्याकडून ब्राह्मण वृंद यांनी स्वामी समर्थ यांच्या चर्म पादुका ऍड. कुलकर्णी यांच्या निवासस्थानी आणून पूजन केले. सकाळी साडे नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत पादुकांचे विधिवत…

Read Full News

आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडभिसे यांच्या हस्ते कुणकेश्वरची शासकीय पूजा…

दर्श अमावास्येच्या महापर्वणीला भाविकांचा महासागर; २५५ पोलिसांचा चोख बंदोबस्त, २३ एसटी गाड्यांचे विशेष नियोजन.. ⚡देवगड ता.१५-:दक्षिण कोकणची काशी म्हणून ख्याती असलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री यात्रोत्सवाला अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात प्रारंभ झाला. दि. १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत पारंपरिक पद्धतीने हा यात्रोत्सव संपन्न होत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला…

Read Full News

हर हर महादेवच्या जयघोषात सावरवाडच्या निर्वाण स्फटिक शिवलिंगाचे पूजन…

मालवण दि प्रतिनिधीसध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेत असलेल्या सावरवाड येथील निर्वाण स्फटीक शिवलिंग मंदिरात आजहर हर महादेव…. जय भोलेनाथच्या जयघोषात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी हिमालयीन स्फटीकापासून बनविलेल्या भारतातील सर्वात मोठ्या अशा सुमारे ५ फूट उंचीच्या शिवलिंगाचे पूजन करीत महाशिवरात्रीच्या उत्सवाचा शानदार प्रारंभ झाला. यानिमित्त सकाळपासून खास ग्रामस्थांसाठी या निर्वाण स्फटीक शिवलिंगासमोर रुद्राभिषेक करतानाच होमहवन…

Read Full News

You cannot copy content of this page