Headlines

Global Maharashtra Breaking News

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मळेवाड – कोंडूरे च्या वतीने शिवजयंती निमित्त स्वच्छता कार्यक्रम चे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१८-: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मळेवाड – कोंडूरे च्या वतीने शिवजयंती निमित्ताने वन्यजीवांसाठी पाणवठ्याची साफसफाई कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीपुजनानंतर कोंडुरे येथील जंगलात जाऊन “वझर तळी” या पाणवठ्यावर परिसर स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .या कार्यक्रमाला वनविभाग अधिकारी,ग्रामस्थ उपस्थित राहणार असून सर्वांनी या स्वच्छता कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन…

Read Full News

माझी वसुंधरा अभियानात कुडाळ न.पं.ची अव्वल कामगिरी..

राज्यात ६२ वरून दहाव्या क्रमांकावर झेप:नागराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.१८-: महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान 5.0 स्पर्धेत कुडाळ नगरपंचायतीने विभागस्तरावर १५ ते २५ हजार लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक पटकावला असून ७५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यावरण विभागाकडून प्राप्त झाल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता…

Read Full News

वेत्ये येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१८-:श्री कलेश्वर पूर्वा देवी युवा कला क्रीडा मित्रमंडळ,यांच्या वतीने गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव श्री कलेश्वर पूर्वा देवी मंदिर, वेत्ये येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सकाळी ८.३० वाजता ढोलताशांच्या गजरात लेझीम, वेषभूषा रॅली वेत्ये सर्कल ते मंदिर दरम्यान काढण्यात येणार…

Read Full News

कोकणचा राजा ‘हापूस’ संकटात…

बागायतदारांचा एल्गारराजू शेट्टींचा शासनाला अल्टिमेटम:कर्जमाफी व हेक्टरी ५ लाख मदत न मिळाल्यास १२ मार्चला ओरोसवर धडक मोर्चा.. ⚡देवगड ता.१८-:कोकणच्या अर्थकारणाचा कणा मानला जाणारा आंबा, काजू व मत्स्य व्यवसाय सध्या अभूतपूर्व संकटात सापडला असून विशेषतः ‘कोकणचा राजा’ हापूस आंबा यंदा अस्मानी आणि सुल्तानी संकटाने होरपळून निघाला आहे. या पार्श्वभूमीवर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी…

Read Full News

वैभववाडीत २१ फेब्रुवारीला दिव्यांग मेळावा…

⚡वैभववाडी ता.१८-: जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल व वैभववाडी नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक 21/02/2026 रोजी सकाळी ठीक 10 ते 2 या वेळे डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन वैभववाडी स्टॅण्डच्या बाजूला वैभववाडी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यामध्ये सभासद नोंदणी,ऑनलाईन प्रमाणपत्र, रेल्वेपास, पेन्शन योजना, स्वावलंबन कार्ड, शिलाई…

Read Full News

YBIT चा सलग तिसऱ्या वर्षी ‘साऊथ इंडिया इंडस्ट्रियल व्हिजिट’ उपक्रम यशस्वी…

बेंगळुरू, चेन्नई, पाँडिचेरीतील नामांकित उद्योगांना भेट; १११ विद्यार्थ्यांचा सहभाग…. ⚡सावंतवाडी ता.१८-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या १११ विद्यार्थ्यांनी ‘इंडस्ट्रियल व्हिजिट’ उपक्रमांतर्गत दक्षिण भारतातील महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट दिली. बेंगळुरू, चेन्नई, पाँडिचेरी आणि महाबलीपुरम या शहरांमधील प्रमुख उद्योग आणि संशोधन संस्थांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेतला. दक्षिण भारतातील औद्योगिक प्रकल्पांना भेट…

Read Full News

आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१८-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून बलप्रितसिंग चड्डा(माजी क्रिकेटपटू गोवा) हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित जि.प.सदस्या सौ.अपर्णा सातोस्कर ,पं.स.सदस्या धनश्री मराठे ,पं.स.सदस्य शरद धाउसकर,मळेवाड माजी उपसरपंच हेमंत मराठे…

Read Full News

आजगाव येथील सुरक्षेसाठी बसविलेले लोखंडी रेलिंग चे काम दुरुस्तीच्या प्रतीक्षेतच…

सदरील घटना स्थळी खोल दरी असून लोखंडी रेलिंग तुटून सहा महिने होऊन गेले तरी अजूनही काम नाही.. ⚡सावंतवाडी ता.१८-: मळेवाड ते आजगाव मुख्य रस्त्यावरील (आजगाव वाघबीळ) येथील रस्त्यावर मागील सहा महिन्यापूर्वी एक अपघात झाला होता.या रस्त्याच्या बाजूलाच एक मोठी खोल दरी असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूने वळण असल्याने येथे प्रवास करताना,वाहन चालवताना मोठी कसरतच करावी…

Read Full News

आरोंदा भटपावणी येथे १९ रोजी शिवजयंती उत्सव…

⚡सावंतवाडी ता.१८-: आरोंदा भटपावणी येथे फ़्रेंड सर्कल क्रिकेट क्लब व भटपावणी विकास मंडळ यांच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा होणार असून या निमित्तानं विविध उपक्रम ,कार्यक्रमांचे भरगच्च असे आयोजन करण्यात आले आहे.यात सकाळी ९ वा.शिवपूजन.११ वा. शालेय मुलांच्या चित्र कला स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, (आरोंदा पंचक्रोशी मर्या. दोन गटात) संध्या. ३ वा.हळदी कुंकू….

Read Full News

डिगस-सुर्वेवाडीत गवे रेड्यांचा उपद्रव…

उन्हाळी पिकांचे नुकसान:बंदोबस्त करण्याची मागणी .. ⚡कुडाळ ता.१८-: कुडाळ तालुक्यातील डिगस सुर्वेवाडी परिसरात भर लोकवस्तीलगत गवा रेड्यांचा उपद्रव वाढला असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात गवा रेड्यांच्या कळपाचा मुक्त संचार सुरू असून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.उन्हाळी पिके गवा रेडे पायदळी तुडवत असून नाचणी, मका, वाली,…

Read Full News

You cannot copy content of this page