सदरील घटना स्थळी खोल दरी असून लोखंडी रेलिंग तुटून सहा महिने होऊन गेले तरी अजूनही काम नाही..
⚡सावंतवाडी ता.१८-: मळेवाड ते आजगाव मुख्य रस्त्यावरील (आजगाव वाघबीळ) येथील रस्त्यावर मागील सहा महिन्यापूर्वी एक अपघात झाला होता.या रस्त्याच्या बाजूलाच एक मोठी खोल दरी असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूने वळण असल्याने येथे प्रवास करताना,वाहन चालवताना मोठी कसरतच करावी लागते.
या रस्त्याच्या दरीच्या बाजूने सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी रेलिंग करण्यात आले होते.मात्र ते सद्य स्थितीत नादुरस्त असून मागील सहा महिन्यापूर्वी येथे एका गाडीला अपघात घडला होता.मात्र या लोखंडी रेलिंग मुळे सुदैवाने कोणाला काहीही झालं नाही.
मात्र हे लोखंडी रेलिंग तुटून तेथे कधीही अपघात घडून एखादी मोठी दुर्घटना घडू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे.
याबाबत मागील सहा महिन्यांपूर्वी बातमी प्रसिद्ध झाली होती.त्यावर लागलीच संबंधित विभागाने तत्काळ काम प्रगतीपथावर असून धोक्या बाबत प्लास्टिक रिबन लावून ठेवली होती.मात्र सहा महिने उलटूनही अजूनही घटनास्थळी काही कार्यवाही झाली नसून,एखादी मोठी दुर्घटना घडली की,बांधकाम विभागाचे डोळे उघडणार काय.असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
त्यामुळे निदान एखादी मोठी दुर्घटना घडण्या आधी संबंधित विभागाने हे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. अशी मागणी ग्रामस्थ, वाहनचालक करत आहेत.
