⚡सावंतवाडी ता.१८-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून बलप्रितसिंग चड्डा(माजी क्रिकेटपटू गोवा) हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित जि.प.सदस्या सौ.अपर्णा सातोस्कर ,पं.स.सदस्या धनश्री मराठे ,पं.स.सदस्य शरद धाउसकर,मळेवाड माजी उपसरपंच हेमंत मराठे ,संस्था उपाध्यक्ष महादेव पांगम,सचिव शांताराम गावडे,शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत,खजिनदार बाळा मोरजकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन परब,प्रवीण मेस्त्री,सामाजिक कार्यकर्ते ओंकार सातोसकर, न्हावेली ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव,पालक शिक्षक संघ उपाध्यक्षा हर्षा मडूरकर कर,पालक सदस्या मनाली आरोसकर,रूपाली मोरजकर,स्वराली मोरजकर,रेश्मा धारगळकर, ,मुख्याध्यापक सदाशिव धुपकर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून श्री सरस्वती देवीच्या मूर्तीला पुष्पहार घालून करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे शाल, श्रीफळ , गुलाबपुष्प देऊन तसेच उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन प्रशालेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी मुख्याध्यापक तथा सचिव शांताराम गावडे यांनी बोलताना सांगितले की, सध्या मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर असून हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून,सर्वांनी ” शाळा वाचवा , शिक्षण वाचवा,” चळवळीत सहभागी होऊन शाळा बंद न होण्यासाठी प्रयत्न करावा तसेच नवनिर्वाचित सदस्यांनी या बाबत सातत्याने पाठपुरावा करून,मराठी शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न करावा असेही आवाहन केले.
यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून, मेहनतीने गुणात्मक यशाच शिखर गाठता येत त्यामुळे विद्यार्थांनी अपयशाला खचून न जाता मेहनत करावी तसेच आपल्या परीने मराठी शाळा वाचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटक बलप्रितसिंग चड्डा यांनी विद्यार्थ्यांना खेळाबाबत योग्य असे मार्गदर्शन करून आपण नेहमीच खेळासाठी तसेच शाळेसाठी सहकार्य करू असे आश्वासन दिले.
उपस्थित पंचायत समिती सदस्य शरद धाउसकर यांनी मराठी शाळा बंद होऊ देणार नसल्याचे सांगतानाच, शिक्षक,पालक, ग्रामस्थ यांच्या त्रिवेणी संगमाने आपण सर्वांनी शाळा वाचवा,शिक्षण वाचवा चळवळीत सहभागी होऊन शाळा वाचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
धनश्री मराठे यांनी सुद्धा आपल्या मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी हेमंत कामत, माजी उपसरपंच हेमंत मराठे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात पाचवी ते बारावीपर्यंतच्या पहिल्या तीन क्रमांकप्राप्त तसेच क्रीडास्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.कुमा.अश्मि पिंगुळकर हिची आदर्श विद्यार्थी तर कुमा.अक्षता झोरे हिची अष्टपैलू विद्यार्थीनी म्हणून निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश देऊलकर ,अहवालवाचन रूपा कामत यांनी तर आभार सुषमा मांजरेकर यांनी मानले.
