वैभववाडीत २१ फेब्रुवारीला दिव्यांग मेळावा…

⚡वैभववाडी ता.१८-: जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल व वैभववाडी नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक 21/02/2026 रोजी सकाळी ठीक 10 ते 2 या वेळे डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन वैभववाडी स्टॅण्डच्या बाजूला वैभववाडी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यामध्ये सभासद नोंदणी,
ऑनलाईन प्रमाणपत्र, रेल्वेपास, पेन्शन योजना, स्वावलंबन कार्ड, शिलाई मशीन, बालसंगोपन ,घरकुल आदी योजनांची माहिती दिली जाईल. गरजू साहित्याचीही नोंदणी केली जाणार आहे.तसेच कमी दृष्टि, पॅरालीसीस, अपघात यामुळे आलेल्या दिव्यांगाची नोंद केली जाणार आहे. व ऑनलाईन नोंदणी केली जाईल. तसेच ज्यांचे ऑनलाईन प्रमाणपत्र नसेल किंवा स्वावलंबन कार्ड नसेल तर त्याचीही नोंद केली जाणार आहे. उपस्थित दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप करण्यात येणार आहे.तरी आपण या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आवाहन साईकृपा संस्था व अध्यक्ष शिंगाडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
त्यासाठी लागणारी कागदपत्रे
UDID स्वावलंबन कार्ड
अपंग प्रमाणपत्र
आधारकार्ड
रेशनकार्ड
पासपोर्ट फोटो ( अस्थिव्यंग असल्यास ४ बाय ६ चा फोटो )
५०,०००च्या आत उत्पन्न दाखला
रहिवाशी दाखला
शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म दाखला
बँक पासबुक

वरील कागदपत्रे असल्यास येतना सोबत आणावी.
अधिक माहिती साठी संपर्क 9765979450 संस्था अध्यक्ष
अनिल शिंगाडे सर.

You cannot copy content of this page