⚡सावंतवाडी ता.१८-:
श्री कलेश्वर पूर्वा देवी युवा कला क्रीडा मित्रमंडळ,यांच्या वतीने गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव श्री कलेश्वर पूर्वा देवी मंदिर, वेत्ये येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
सकाळी ८.३० वाजता ढोलताशांच्या गजरात लेझीम, वेषभूषा रॅली वेत्ये सर्कल ते मंदिर दरम्यान काढण्यात येणार आहे. सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी ११.०० वाजता नारायणी प्रस्तुत ‘स्वामीगंध’ हा अभंग, भावगीत व भक्तिमय कार्यक्रम होणार असून प्रमुख गायक म्हणून नागेश पाटील (राधेचे खुद्द) उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १.०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३.०० वाजता हळदीकुंकू कार्यक्रम, तर सायंकाळी ४.३० वाजता खेळ पैठणीचा व सन्मान नारीशक्तीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमास कोकण अँकर अॅड. प्रणीता कोटकर-राजळ उपस्थित राहणार आहेत.
तसेच रात्री ठीक ९.०० वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. हा प्रयोग ७८ वा प्रयोग असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
