Headlines

Global Maharashtra Breaking News

मसुरे देऊळवाडा शाळेत शिवकालीन साधनांचे प्रदर्शन संपन्न…

⚡मालवण ता.२०-:दुर्ग मावळा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग, दुर्गरक्षक प्रतिष्ठान, रेडी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्थेने मसुरे देऊळवाडा जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेत इतिहासाची साधनांचे प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना शिवकालीन हत्यारे अनुभवता आली. यावेळी ज्ञानेश्वर राणे यांनी शिवरायांच्या इतिहासातील सुवर्णक्षणांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच विविध भौतिक, लिखित व मौखिक साधनांचे सादरीकरण केले. प्राचीन…

Read Full News

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कठोर कायदा करा…

कणकवली तहसीलदारांना हिंदू जनजागृती समितीचे निवेदन ⚡​कणकवली ता.१९-:उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर व अजामीनपात्र कायदा तातडीने संमत करावा, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्राला या संकटातून मुक्त करावे, अशी…

Read Full News

देवगड तालुका मराठा समाज आयोजित शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा…

⚡देवगड ता.१९-: शिवजयंती निमित्त जिल्हा परिषद केंद्र देवगड च्या विद्यार्थ्यांना मराठा समाजाचा वतीने विजयदुर्ग येथे नेण्यातआले आणि किल्ल्याचा इतिहास मुलांना सांगण्यात आला. या मोहिमेत ५५ विद्यार्थ्यांनी व ११ शिक्षकांनी सहभाग घेतला होता. सकाळी ९ वाजता देवगड बस स्थानकातून रॅली ला सुरुवात करण्यात आली. विजयदुर्ग येथे पोचल्यानंतर विजयदुर्ग जेटी ते किल्ला अशी वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली….

Read Full News

सिंधुदुर्ग आंबा बागायतदार शेतकरी शिष्टमंडळ यांची उद्या मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक…

⚡वेंगुर्ला ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी बागायतदार व्यापारी यावर्षीच्या सुमारे 10 टक्के इतक्या अल्प उत्पादनामुळे आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. याबाबत बुधवारी वेंगुर्ला येथे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह बागायतदार यांची बैठक संपन्न झाली होती. त्यानुसारआंबा बागायतदार शेतकरी – व्यापारी यांनी आज गुरुवारी कणकवली येथे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेत वस्तुस्थिती व कैफियत…

Read Full News

श्री देव महापुरुष मंदिर रौप्यमहोत्सव…

१९ ते २२ फेब्रुवारी प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळापालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट:मंडळाच्या कार्याचे कौतुक.. ⚡कणकवली ता.१९-:शहरातील मुख्य बाजारपेठेतील प्रसिद्ध श्री देव महापुरुष मंदिर येथे रौप्यमहोत्सवानिमित्त दि. १९ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत श्री देव गणपती व श्री देव महापुरुष यांच्या नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. चार दिवस…

Read Full News

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या कार्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून कौतुक…

⚡कणकवली ता.१९-: मागील २१ वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्य करणाऱ्या लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडीच्या कार्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कौतुक केले. युवकांची एकी हीच खरी ताकद असून अशा मंडळांमुळे समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होते, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या वतीने कलारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले…

Read Full News

मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी शिवजयंती उत्साहात साजरी…

शिवकालीन दुर्मिळ व निवडक प्रतिकृतींच्या प्रदर्शनाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद… ⚡सावंतवाडी ता.१९-: तालुक्यातील मळगाव–रस्तावाडी येथील शिवभक्त ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शिवजयंतीनिमित्त खास राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या उपक्रमाचे यंदाचे सलग आठवे वर्ष असून, शिवकालीन इतिहासाचे संवर्धन व पुढील पिढीपर्यंत तो प्रभावीपणे…

Read Full News

मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत वैभव नाईक यांच्याकडून दिशाभूल…

दत्ता सामंत:त्यांच्याच कार्यकाळात ३५२ मच्छिमारांना नोटिसा आल्या होत्या, मग तेव्हा त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही..? ⚡मालवण ता.१९-:मालवण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांना बांधकामाबाबत येणाऱ्या नोटिसांच्या प्रश्नावर माजी आमदार वैभव नाईक हे चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करत आहेत. मुळात २०१६ ते २०२४ या त्यांच्याच कार्यकाळात ३५२ मच्छिमारांना नोटिसा आल्या होत्या, मग तेव्हा त्यांनी हा प्रश्न का…

Read Full News

म्हापण-खालचीवाडी येथील श्री देव दांडेकर मंदिराचा २३ ला वर्धापनदिन सोहळा…

⚡कुडाळ ता.१९-: वेंगुर्ले तालुक्यात म्हापण खालचीवाडी येथील श्री देव दांडेकर मंदिराचा पंधरावा वर्धापन दिन सोहळा २३ फ्रेब्रूवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.या निमित्त २३ रोजी सकाळी ९ वा. अभिषेक, सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १. वा. आरती, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, दुपारी ३ वा. तिर्थप्रसाद, सायं. ४ वा. निवती महिला भजन मंडळ यांचे…

Read Full News

म्हापण-मळई येथे माळरानावर लागलेल्या आगीत ३५ एकर क्षेत्र बाधित…

⚡कुडाळ ता.१९-: वेंगुर्ले तालुक्यात म्हापण मळई गांवच्या माळरानावर गुरुवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास अचानक आग लागली. सुक्या गवताने पेट घेतल्याने आग सर्वत्र विखुरली. सुमारे 30 ते ३५ एकर क्षेत्र बांधीत झाले. म्हापण मळई बावळी परीसरात आग गेल्याने तेथील विजय ठाकूर यांच्यासह पाच सहा शेतकऱ्यांची आंबा काजू कलमे जळून मोठे नुकसान झाले. काही भागातील काजू व…

Read Full News

You cannot copy content of this page