म्हापण-मळई येथे माळरानावर लागलेल्या आगीत ३५ एकर क्षेत्र बाधित…

⚡कुडाळ ता.१९-: वेंगुर्ले तालुक्यात म्हापण मळई गांवच्या माळरानावर गुरुवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास अचानक आग लागली. सुक्या गवताने पेट घेतल्याने आग सर्वत्र विखुरली. सुमारे 30 ते ३५ एकर क्षेत्र बांधीत झाले. म्हापण मळई बावळी परीसरात आग गेल्याने तेथील विजय ठाकूर यांच्यासह पाच सहा शेतकऱ्यांची आंबा काजू कलमे जळून मोठे नुकसान झाले. काही भागातील काजू व आंब्याची कलमे ही जळाली आहेत तर काही झाडांना मोठी झळ बसली आहे. आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले, मात्र वारा व सुकं गवत (कराड ) यामुळे आग पसरत गेली. शेतकऱ्यांच्या प्रसंगवधानले मुळे मोठे नुकसान टळले

You cannot copy content of this page