बापर्डे येथे मोटरसायकल बोलेरो अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार…

⚡देवगड ता.१९-: बापर्डे तळेबाजार रस्त्यावर बापर्डे येशीची व्हाळी या ठिकाणी मोटरसायकलची समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीला धडक बसून झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार सागर फुलू चव्हाण(२३) रा.पळसंब आचरा ता.मालवण हा जागीच ठार झाला आहे.हा अपघात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वा.सुमारास घडला.या अपघाताची देवगड पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पळसंब येथील सागर फुलू चव्हाण व त्याचा सहकारी अरूण बळवंत चव्हाण(२१) हे दोघे मोटरसायकल क्रमांक केअ‍े २८- ईजे ६३४४ या मोटरसायकलने बापर्डे तळेबाजार मार्गावरून तळेबाजारच्या दिशेने जात होते दरम्यान याच मार्गावरून वाघोटनकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअप क्रमांक एम् एच्.०७ – अ‍ेजे ३४३९ या गाडीला मोटरसायकलची समोरून जोरदार धडक बसली.या अपघातात मोटरसायकलस्वार सागर चव्हाण याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यु झाला.तर त्याच्यासमवेत मोटरसायकलवर असलेला त्याचा सहकारी अरूण चव्हाण याच्या डोक्याला, हातापायाला गंभीर दुखापत झाली.अपघाताची नोंद देवगड पोलिस स्थानकात करण्यात आली असून तपास पो.हे.कॉ. आशिष कदम करीत आहेत.

You cannot copy content of this page