Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा-मडूरा येथे मोकळा श्वास फाऊंडेशनकडून व्यसनमुक्ती जनजागृती अभियान…

⚡बांदा ता.२०-: मोकळा श्वास फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा व मडूरा येथील विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थ आणि विविध व्यसनांपासून दूर राहण्याबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या व्यसनप्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला.बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांशी फाऊंडेशनचे…

Read Full News

हळवल येथे अमेय मडव यांना ‘समाजमित्र’ पुरस्कार प्रदान…

⚡बांदा ता.२०-: लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल(परबवाडी) हे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना समाजमित्र पुरस्कार देऊन गौरव करतात. शिवजयंतीचे औचित्य साधत लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल (परबवाडी) यांच्या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन पार पडले. दरम्यान मंडळाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा “समाजमित्र” पुरस्कार सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अमेय मडव यांना प्रदान करण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष लवू…

Read Full News

धुरीवाडा येथील स्वामी समर्थ मठात २३ रोजी मूर्तीप्रतिष्ठापना वर्धापन दिन…

⚡मालवण ता.२०-:मालवण धुरीवाडा – कुरण येथील श्री स्वामी समर्थांच्या मठात मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा एकोणिसावा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. यानिमित्ताने सकाळी अभिषेक, पूजन, नामस्मरण आणि श्रीभक्त श्री. रवींद्र मनोहर सारंग व सौ. रविना रवींद्र सारंग यांच्या हस्ते श्री सत्यदत्ताची महापूजा आयोजित केली आहे. दुपारी १ ते ४ महाप्रसाद, दुपारी १…

Read Full News

पंतप्रधानांच्या मालवण दौऱ्यावेळीच मच्छिमारांना जास्त नोटीसा आल्या…

हरी खोबरेकर :नोटिसांचा जाच न थांबल्यास महसूल विभागावर मोर्चा काढण्याचा इशारा… ⚡मालवण ता.२०-:आम. निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडून किनारपट्टीवर ३५२ नोटिसांचा जो पाढा वाचला जात आहे, त्यातील बहुतांश नोटिसा या २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मालवण दौऱ्याच्या वेळी काढण्यात आल्या होत्या. त्या नोटिसा कुणामुळे आल्या? त्यावेळी शासन कोणाचे होते ? त्यावेळी मच्छीमारांच्या झोपड्या…

Read Full News

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती…

जागतिक एआय रोडमॅपचा घेतला सखोल आढावा:महाराष्ट्रातील स्टार्टअप्सच्या कामगिरीचे मंत्री नितेश राणे यांच्याकडून कौतुक.. ⚡नवी दिल्ली-: नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ या जागतिक दर्जाच्या शिखर परिषदेत राज्याचे मंत्री श्री.नितेश राणे यांनी उपस्थित राहून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील जागतिक घडामोडी, विविध देशांची धोरणे आणि भविष्यातील एआय रोडमॅप यांचा सखोल आढावा…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नोकर भरती मधील उमेदवारांची परिक्षा दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर…

⚡सिंधुदुर्ग दि.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेल्या लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाची आहेत. त्यासाठीची भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस (इन्स्टिट्यूट बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबवली जात आहे. सदरची परिक्षा जिल्ह्यातील विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे घेतली गेली नव्हती.सदर परीक्षेची तारीख आय.बी.पी.एस कंपनीकडून दि.२८ फेब्रुवारी २०२६ अशी निश्चित…

Read Full News

शिवजयंती निमित्त आरोस विद्या विकास हायस्कूल मध्ये जल्लोष …

⚡सावंतवाडी ता.२०-: शिवजयंतीचे औचित्य साधून आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक पोशाख घालून कार्यक्रमात रंगत आणली. शिवजयंती निमित्त प्रशालेत सकाळी शिवप्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध…

Read Full News

ढोल-ताशांच्या गजरात महापुरुष मंदिराची भव्य मिरवणूक; भक्ती आणि एकोप्याचा संगम…!

⚡कणकवली ता.२०-:कणकवली शहरात शुक्रवारी सायंकाळी ढोल-ताशांचा दणदणाट, टाळ-मृदुंगाचा नाद, पारंपरिक वेशभूषेत महिलांचे लेझिम नृत्य आणि “श्री देव गणपती, श्री देव महापुरुष, साईबाबा की जय”च्या जयघोषात निघालेली भव्य सवाद्य मिरवणूक लक्षवेधी ठरली. श्री देव महापुरुष मंदिर च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या मिरवणुकीत भक्ती, परंपरा आणि एकोप्याचे सुंदर दर्शन घडले.मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त २० ते २२ दरम्यान…

Read Full News

शिवजयंती निमित्त वसुंधरा जनकल्याण फाउंडेशनतर्फे वृक्ष वाटप…

⚡मालवण ता.२०-:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वसुंधरा जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने मालवण एस टी स्टँड येथे वृक्ष वाटप अभियान संपन्न झाले. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ४० नागरिकांना मोफत झाडे वाटप करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन वाहतूक निरीक्षक स्वप्नील गडदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. वृक्ष लागवड ही काळाची गरज असून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान…

Read Full News

मुलांना वाचनाची सवय लावा-: साहित्यिका कल्पना मलये….

⚡मालवण ता.२०-:आजच्या युवा पिढीमध्ये वाचनाचे प्रमाण फार कमी झाले आहे. त्यामुळेच समाजात घडणाऱ्या घडामोडींबाबत युवा पिढीला फारशी माहिती नसते. युवा पिढीचा समाजाशी असणारा संवाद तुटत चालला आहे. हा संवाद पुन्हा जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी मुलांना वाचनाची सवय लावावी असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका कल्पना मलये यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कट्टा येथे बोलताना केले. भारतीय…

Read Full News

You cannot copy content of this page