Headlines

Global Maharashtra Breaking News

महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडीच्या वतीने युवा दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

*💫सावंतवाडी दि.१२-:* महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ सिंधुदुर्ग सावंतवाडी शाखेच्या “आरोग्य समिती” आणि “युवा मंच” यांच्या संयुक्त विद्यमाने “युवा दिनानिमित्त” आज दि 12 जानेवारी रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरास 40 बांधव सहभागी झाले होते. त्यातील 25 जणांनी रक्तदान करून सहकार्य केले आहे. या शिबिराचे उद्घाटन मंडळाचे माजी अध्यक्ष श्री बाळ पुराणिक, शिवानंद भिडे यांच्या…

Read Full News

युवासिंधू फाउंडेशन च्या वतीने आनंदाश्रमास भेट*

माँसाहेब जिजाऊ आणि युवा दिन यांचे औचित्य साधत दिली भेट *💫कुडाळ दि.१२-:* राजमाता जिजाऊ माॅंसाहेब जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवस या दिवसाचे औचित्य साधून आणाव येथील आनंदाश्रमला भेट देऊन युवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून हा अमूल्य क्षण येथील वयोवृद्ध माता, आजोबा यांच्या सोबत त्यांना खाऊ, मास्क तसेच आश्रमात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला आहे.

Read Full News

अज्ञात चोरट्यांचा बंद घरात चोरी करण्याचा प्रयत्न

घरात काहीच न सापडल्याने प्रयत्न फसला; मात्र परिसरात भितीचे वातावरण मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील गोठणे गावातील दोघा मुंबईस्थित चाकरमान्यांची बंद असलेली घरे अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री लक्ष्य करीत ही दोन्ही घरांच्या दरवाजाची कडी कोयंडे धारदार हत्याराने तोडून घरात प्रवेश करीत चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने अज्ञात चोरट्याच्या हाती काहीच हाती न लागल्याने संबंधितांचे…

Read Full News

एक्साईज अधिकारी धक्काबुक्की प्रकरणी दोन संशयितांना सशर्त जामीन मंजूर

एक्साईज अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या चार संशयित आरोपींपैकी तुषार तुळसकर, सावंतवाडी व विठ्ठल चौगुले,माजगाव या दोघांना प्रत्येकी २० हजाराच्या जामिनावर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर अन्य दोघांची न्यायालयीन कोठडी कायम ठेवली आहे. याकामी अँड संग्राम देसाई व अँड. पंकज आपटे यांनी काम पाहिले आहे.

Read Full News

जाळे ओढताना तोल जाऊन मालवण येथील मच्छिमाराचा मृत्यू…

*💫मालवण दि१२-:* मासेमारीचे जाळे ओढत असताना तोल जाऊन समुद्रात पडल्याने शंकर सखाराम फोंडबा (वय-५७ रा. सर्जेकोट) या मच्छीमाराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याची खबर नितीन परुळेकर यांनी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी- सर्जेकोट येथील माऊली कृपा यांच्या मासेमारीच्या पातीवरून कवडा रॉक…

Read Full News

जिल्हा बार असोसिएशन मार्फत होणार उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती श्री. सुरेंद्र तावडे यांचा सत्कार

बार असोसिएशन सदस्य अँड संग्राम देसाई यांची माहिती* *💫सावंतवाडी दि.१२-:* सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व गोवा करिताचे पालक सदस्य अँड . संग्राम देसाई यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले व उच्च न्यायालय मुंबईचे विद्यमान न्यायमूर्ती श्री. सुरेंद्र पंढरीनाथ तावडे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले व…

Read Full News

आचरा किनाऱ्यावर सापडलेला मोबाईल केला परत

आचरा पोलीस ठाण्याच्या महिला हेडकॉन्स्टेबल एम एम देसाई यांची तत्परता *💫मालवण दि.१२-:* आचरे किनाऱ्यावर सायंकाळी उशिरा बसण्याच्या जागेवर एक स्मार्टफोन विसरून गेल्याचे पिरावाडी येथील प्रशांत कोरगावकर यांना दिसून आला त्यांनी याची माहिती किनाऱ्यावर गस्ती साठी हजर असलेल्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल एम एम देसाई यांना दिली. सापडलेल्या मोबाईलला लॉक असल्याने मोबाईल कोणाचा आहे समजून येत नव्हते…

Read Full News

चांदेर आणि तळाणीवाडी ही दोन्ही महसुली गावे मसुरे तलाठी सजाला जोडण्यात यावी

चांदरचे सुपुत्र डॉ दीपक परब यांची मागणी *💫मालवण दि.१२-:* मालवण तालुक्यातील चांदेर आणि तळाणेवाडी या दोन गावाची महसुली कामे ही आंगणेवाडी येथील तलाठी कार्यालयाकडे देण्यात आली असून काही काही वेळा आंगणेवाडी गावचे तलाठी हे कार्यालयात अनुपस्थित असल्यास चांदेर, तळाणीवाडी गावच्या लोकांचे गैरसोय होतेच शिवाय या गावच्या लोकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून त्यांचा वेळेचा अपव्यय…

Read Full News

शासनाने शेतकऱ्यांना प्रती गुंठा १०० रुपये मदत करून केली शेतकऱ्यांची चेष्ठा

*मालवणचे उपसभापती राजू परुळेकर यांची सरकार वर टीका मालवण-:शेतकरी नुकसान भरपाईपोटी शासनाने शेतकर्‍यांसाठी प्रतिगुंठा १०० रुपये आर्थिक मदत करताना शेतकर्‍यांची चेष्टा केल्याचा आरोप करीत मालवणचे उपसभापती राजू परुळेकर यांनी शेतीसाठी होणारा खर्च पाहता एवढी मदत घेण्यासाठी आमचा शेतकरी गरीब नाही. नुकसानीच्या पाहणीसाठी मोठे दौरे करूनही तुटपुंजी मदत दिली जात असेल तर यापुढे अशी पाहणी करू…

Read Full News

महाराष्ट्र माईन्स वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली त्या कंपनीतील ५३ कामगारांचे उपोषण सुरू

वेतन न मिळाल्याने त्या कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सिंधूदुर्गनगरी ता १२-: मे. चिराग सेंडिटेक्स्ट प्रा. ली. फोंडाघाट या कंपनीत कार्यरत असलेल्या ५३ कामगारांना २३ मार्च २०२० पासून कंपनीने वेतन दिले नाही. तब्बल ९ महिने वेतन थकीत असल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडे वारंवार लक्ष वेधून वेतन मिळत नसल्याने या कंपनीतील…

Read Full News

You cannot copy content of this page