आचरा किनाऱ्यावर सापडलेला मोबाईल केला परत

आचरा पोलीस ठाण्याच्या महिला हेडकॉन्स्टेबल एम एम देसाई यांची तत्परता

*💫मालवण दि.१२-:* आचरे किनाऱ्यावर सायंकाळी उशिरा बसण्याच्या जागेवर एक स्मार्टफोन विसरून गेल्याचे पिरावाडी येथील प्रशांत कोरगावकर यांना दिसून आला त्यांनी याची माहिती किनाऱ्यावर गस्ती साठी हजर असलेल्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल एम एम देसाई यांना दिली. सापडलेल्या मोबाईलला लॉक असल्याने मोबाईल कोणाचा आहे समजून येत नव्हते यावेळी महिला हेडकॉन्स्टेबल देसाई यांनी वाट बघत न बसता समवेत असलेल्या महिला होमगार्ड गायत्री धनावडे यांना सोबत घेत किनाऱ्यावर चौकशी सुरू केली. चौकशी करत त्या मोबाईल ज्यांचा मोबाईल हरवला होता त्या तन्वी जगन्नाथ जोशी यांच्यां पर्यंत पोहचल्या. त्यांचाच मोबाईल असल्याची खात्री करून त्यांना मोबाईल परत केला. महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल देसाई यांच्या तत्परतेमुळे जोशी यांना मोबाईल हरवल्यापासून काहीवेळातच मोबाईल परत मिळाला आहे.

You cannot copy content of this page