चांदरचे सुपुत्र डॉ दीपक परब यांची मागणी
*💫मालवण दि.१२-:* मालवण तालुक्यातील चांदेर आणि तळाणेवाडी या दोन गावाची महसुली कामे ही आंगणेवाडी येथील तलाठी कार्यालयाकडे देण्यात आली असून काही काही वेळा आंगणेवाडी गावचे तलाठी हे कार्यालयात अनुपस्थित असल्यास चांदेर, तळाणीवाडी गावच्या लोकांचे गैरसोय होतेच शिवाय या गावच्या लोकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून त्यांचा वेळेचा अपव्यय होतो हे सारे लक्षात घेऊन आंगणेवाडी तलाठी सजाला जोडलेली ही दोन्ही गावे मसुरे तलाठी सजाला जोडण्यात यावी अशी आग्रही मागणी चांदेर गावचे सुपुत्र आणि उद्योजक डॉ. दिपक परब यांनी केली आहे. पंचवीस तीस वर्षापूर्वी मालवण तालुक्यातील चांदेर आणि तळाणेवाडी ही दोन गावे आंगणेवाडी तलाठी कार्यालयाला जोडण्यात आली. आंगणेवाडी गावा लगतच चांदेर आणि तळाणेवाडी ही गावे असली तरी या दोन्ही गावातील लोकांना आंगणेवाडी मध्ये यायचे असल्यास जवळचा मार्ग म्हणून जंगलमय भागातून यावे लागते. जर महसुली कामाच्या निमित्ताने चांदेर तळाणेवाडीतील लोकांना आंगणेवाडीला यावे लागले आणि त्याठिकाणी तलाठी किंवा मंडळ अधिकारी उपस्थित नसतील तर चांदेर- तळाणेवाडी लोकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो तसेच त्यांच्या वेळेचाही अपव्ययही होतो. त्यामुळे या गोष्टींचा विचार करून चांदेर तळाणेवाडीतील ग्रामस्थांना मसुरे गाव हा जवळचा आणि सोयीचा वाटत असल्याने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चांदेर- तळाणेवाडी ही दोन्हीं गावे आंगणेवाडीला महसूल दप्तरीसाठी जोडण्यात आली आहे ती मसुरे तलाठी कार्यालयाला जोडण्यात यावी व ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी डॉ. दिपक परब यांनी केली आहे.