महाराष्ट्र माईन्स वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली त्या कंपनीतील ५३ कामगारांचे उपोषण सुरू

वेतन न मिळाल्याने त्या कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

सिंधूदुर्गनगरी ता १२-: मे. चिराग सेंडिटेक्स्ट प्रा. ली. फोंडाघाट या कंपनीत कार्यरत असलेल्या ५३ कामगारांना २३ मार्च २०२० पासून कंपनीने वेतन दिले नाही. तब्बल ९ महिने वेतन थकीत असल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडे वारंवार लक्ष वेधून वेतन मिळत नसल्याने या कंपनीतील कामगारांनी महाराष्ट्र माईन्स वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात आणि थकीत वेतन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यावेळी महाराष्ट्र माईन्स वर्कर्स युनियनचे अध्यक्ष रामचंद्र धुरी, सरचिटणीस विजय सावंत, संजय तेली, संदीप कानडे, संदीप जाधव, माधुरी लाड, सायली तेली, सुचिता नानाचे आदी कामगार बेमुदत उपोषणा त सहभागी झाले आहेत. मे. चिराग सेंडिटेक्स्ट प्रा. लि. फोंडाघाट या माईन्स कंपनीमध्ये गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या ५३ कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने २३ मार्च २०२० पासून वेतन दिलेली नाही. याबाबत कंपनीकडे अनेकवेळा या कामगारांनी लक्ष वेधलं होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे या कामगारांनी याबाबत सरकारी कामगार अधिकारी यांचे लक्ष वेधले होते. यावेळी ७ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या चर्चेत ११ जानेवारी पूर्वी यावर तोडगा काढला जाईल असे आश्वासन कंपनी व्यवस्थानाकडून देण्यात आले होते. तसेच ही कंपनीचं बंद करत असल्याचे पत्र मे चिराग सेंडिटेक्स्ट प्रा. ली कंपनीने कामगारांना दिले. त्यामुळे घर का ना घाट का अशी परिस्थिती झालेल्या कामगारांनी आज मंगळवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र माईन्स वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात आणि थकीत वेतन मिळावे यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संबंधित कंपनीकडे ५३ कामगारांचे ९ महिन्यांचे वेतन थकीत आहे. या कंपनीने एकही कर्मचाऱ्याला अन्य लाभ दिले नाहीत. ५३ पैकी ३ कामगारांचा आता मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना मदत करण्याबाबत कंपनी काही करत नाही तसेच आता अनेक कामगार आजारी आहेत पण त्यांना कंपनी व्यवस्थान वेतन देत नाही असेही यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र धुरी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page