प्रत्यक्ष खासदार विनायक राऊत यांनी पाहणी करीत दिल्या सुचना
*💫कणकवली दि.१२-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव तिठा व नांदगाव ओटव फाटा अशा ठीकाणचे सर्व्हीस रस्ते अपूर्ण असल्याने गेले वर्षभरात दोन वेळा आंदोलने झाली .नुकतेच नांदगाव सेनेने उपोषण केले होते यावेळी उपोषण कर्त्यांची भेट घेत संदेश पारकर यांनी या सर्वांची चर्चा घडवून आणण्याची ग्वाही दिली होती तो शब्द दान ते तिन दिवसातच अंमलात आणून नांदगाव येथेच खासदार विनायक राऊत यांनी भेट देत या समस्यांची पाहणी करून जे प्रलंबीत भुमीअभिलेख मुळे जे राहीले आहे यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना अधिका-यांना दिल्या आहेत . तसेच गेल्या महीन्यात नांदगाव येथील रोहन नलावडे यांनी तीन दिवस साखळी उपोषण केले होते यांच्या घरी जावून त्यांनी येथीलही प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कार्यवाहीच्या सुचना दिल्या आहेत. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या सोबत प्रांताधिकारी वैशाली राजमाने ,तहसिलदार रमेश पवार ,हायवेप्राधिकरणचे कार्यकारी अभियंते ए.ए.ओटवणेकर,भुमीअभिलेख चे प्रभारी उपअभियंते श्री तुपकर ,नांदगाव मंडळ अधिकारी जाधव मॅडम ,नांदगाव तलाठी सुदर्शन अलकुटे तसेच नांदगाव शाखा प्रमुख राजा म्हसकर,ग्रा.पं.सदस्य अरूण बापार्डेकर ,अब्दुल नावलेकर ,बाळा मोरये,बाळा सातोसे ,गवस साठविलकर, तसेच राष्ट्रवादीचे रज्जाक बटवाले आदी नांदगावातील हायवे बाधित उपस्थीत होते. एकाच साईटने असल्याने अपघात होण्याची शक्यता असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे .यासाठी गेल्यावर्षी नांदगाव ग्रामस्थांचे आंदोलन झाले होते .मात्र एक वर्ष लोटूनही अद्याप जमिन मोजणे व निस पुरणे या पलिकडे काहीच हालचाल न झाल्याने नांदगाव शिवसनेतर्फे संबधित विभागाला पुन्हा आंदोलनाची नोटीस बजावण्यात आली होती .यावर कोणत्याही प्रकारे चर्चा न झाल्याने घोषीत केलेले शिवसेनेतर्फे उपोषण करण्यात आले होते . शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या यशस्वी मध्यस्तीनंतर उपोषण सोडण्यात आले .संदेश पारकर यांनी हायवे प्राधिकरण ,भुसंपादन ,नांदगाव ग्रामस्थ ,यांची प्रांताधिकारी यांच्या सोबत संयुक्तीक चर्चा घडवून आणून यातून मार्ग काढयाचे आश्वसीत करण्यात आल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.मात्र तीन ते चार दिवसातच हा योगायोग संदेश पारकर यांनी जूळवून आणत खांसदार विनायक राऊत यांनी प्रत्यक्ष नांदगाव येथेच भेट दिल्याने चालढकल करणा-यांनाही नांदगावला धावत यावे लागले याचीच चर्चा नांदगावला ऐकायला मिळत होती .